तरुण भारत

होमक्वारंटाईनचा शिक्का असलेल्या वृद्धाचा दापोलीत मृत्यू; यंत्रणा सतर्क

प्रतिनिधी/दापोली

दापोली तालुक्यातील बुरोंडी ग्रामपंचायतच्या हद्दीतील तेलेश्वर नगर येथे मुंबई येथून होळी निमित्त आलेल्या एका वृद्धाचा काल रात्री दापोली येथे उपचारासाठी आणताना मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ते लॉकडाऊनमुळे इथेच अडकून पडले होते.

मृत व्यक्ती 22 मार्च रोजी घाटकोपर (मुंबई) येथून बुरोंडी येथे आपल्या घरी आली होती. मुंबई येथून आल्याने आरोग्य विभागाने त्यांना होमक्वारंटाईनचा सल्ला दिला होता. मुंबई येथून ते एकटेच आले होते, त्यांची पत्नी व दोन मुले घाटकोपर येथेच आहेत. काल गुरुवारी रात्री 11 वाजणेचे सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना दापोली येथील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले तेथे तपासून त्यांना उपजिल्हारुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात नेल्यावर तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. या व्यक्तीच्या हातावर होमक्वारंटाईनचा शिक्का असल्याने लगेचच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली.

मृत व्यक्तीच्या स्वॅबचा नमुना घेण्यात आला असून तो तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आला आहे. तो शनिवारी सकाळी पर्यंत येणे अपेक्षित आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यावरच सदर व्यक्ती ही कोरोना ग्रस्त होती की नाही याबाबतचा उलगडा होणार आहे.

दरम्यान या व्यक्तीला रात्री घेऊन आलेल्या 10 गावकऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून कृषी विद्यापीठाच्या शेतकरी निवास येथील क्वॉरंटाईन कक्षात दाखल करण्यात आले आहे. दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृत्यू कशाने झाला? हे नेमके कळू शकलेले नाही, मिरज येथून अहवाल आल्यावरच मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ शिवा बिरादार यांनी सांगितले.

Advertisements

Related Stories

नारायण राणेंना अटक?; पोलिसांचं पथक चिपळूणला रवाना

triratna

मृत्यूच्या तांडवापुढे फ्रान्स हतबल!

NIKHIL_N

जिल्हय़ात कोरोनाचे नवे 27 रूग्ण

Patil_p

महिला सक्रिय झाल्या तरच बौद्ध चळवळ गतिमान

NIKHIL_N

सिंधुदुर्गात 3,176व्यक्ती दाखल

NIKHIL_N

‘टीईटी’ पात्रताधारक उमेदवार पुढच्या वर्षी ठरणार बाद

Patil_p
error: Content is protected !!