तरुण भारत

बाहेर फिरणाऱयांवर हवाई डोळय़ाची नजर

निपाणीत पोलिसांतर्फे ड्रोन कॅमेरा कार्यरत : नियम उल्लंघन करणाऱयांना काठीचा प्रसाद

प्रतिनिधी / निपाणी

Advertisements

लॉकडाऊन काळात नियम उल्लंघन करणाऱयांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी सरकारने बहुतांशी अधिकार पोलीस प्रशासनास दिले आहेत. त्यामुळे अधिकाराचा वापर करण्यासाठी पोलीस प्रशासन अधिकच आक्रमक झाले आहे. निपाणीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱयांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरा कार्यरत झाला आहे. यामध्ये दोषी आढळणाऱयांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस तत्पर झाले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालल्याने लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक स्वरुपात केली जात आहे. असे असतानाही निपाणीत सकाळच्या सत्रात तसेच सायंकाळी विनाकारण रस्त्यावर अनेकजण दिसून येत आहेत. यापूर्वी असे दिसणाऱयांना पोलिसांकडून काठीचा प्रसाद देण्यात आला आहे. तरीदेखील अनेकांकडून लॉकडाऊनचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे आता ड्रोन कॅमेरा कार्यरत करण्यात आला आहे. त्यानुसार संपूर्ण शहरावर नजर ठेवली जात आहे.

‘त्या’ चौघांचे अहवाल निगेटिव्ह?

बेळगाव जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने निपाणी भागात सतर्क झालेल्या आरोग्य खात्याने निपाणी परिसरातील चारजणांचे स्वॅब बेंगळूरला पाठविले होते. त्यानुसार या चौघांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे समजते. मात्र प्रशासनाकडून त्याला दुजोरा मिळालेला नाही. असे असले तरी कोरोनाचा फैलाव गुणाकार स्वरुपात होत असल्याने शहर व ग्रामीण भागात प्रत्येकाने लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Related Stories

महिलेच्या गळय़ातील सोन्याचे गंठण भामटय़ांनी लांबविले

Patil_p

‘त्या’ जाचक कायद्याविरोधात शेतकऱयांचे उद्या पुन्हा आंदोलन

Amit Kulkarni

गांधीनगर येथे ट्रकचे आठ टायर चोरले

Patil_p

जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर यश संपादन करा

Omkar B

मासिक बसपासच्या मागणीत वाढ

Patil_p

पीएफ कार्यालय तातडीने सुरु करावे

Patil_p
error: Content is protected !!