तरुण भारत

कोरोनाची भीती, 50 डॉक्टरांचा राजीनामा

मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर जिल्हय़ात एकाचवेळी 50 डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. परंतु राज्यात एस्मा लागून असल्याने अत्यावश्यक सेवेशी संबंधित लोक कर्तव्यापासून मागे हटू शकत नाहीत.

कोरोना संकटामुळे ग्वाल्हेरच्या गजराजा वैद्यकीय महाविद्यालयात 3 महिन्यांसाठी 92 डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती. या सर्व डॉक्टरांनी याच महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले होते. या डॉक्टरांची नियुक्ती विविध विभागांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आली होती. कोरोना संकटाच्या उपाययोजनांकरता वैद्यकीय शिक्षण विभागाने गजराजा मेडिकलसह अन्य वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस इंटर्न करणाऱयांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त करण्याचा आदेश दिला होता.

Advertisements

गजराजा वैद्यकीय महाविद्यालयात 114 जणांची नियुक्ती करण्यात आली होती. यातील 92 जणांनीच सेवेस प्रारंभ केला होता. या डॉक्टरांना सुपर स्पेशालिटी आणि आयसोलेशन वॉर्डमध्ये तैनात करण्यात आले होते. यातील 50 डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. परंतु आता यातील 42 डॉक्टरच शिल्लक राहिल्याने आगामी काळात रुग्णांच्या अडचणी वाढू शकतात.

कोरोनासंबंधी विभागात काम करण्याची इच्छा नसल्यास बाहेर पडू शकता असा आदेश आल्याने राजीनामा दिल्याची माहिती या डॉक्टरांनी दिली आहे. आम्ही स्थानिक असल्याने कोरोनाबाधितांचा उपचार केल्यास याचा प्रभाव आमच्या कुटुंबावर पडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

उत्तराखंडात 448 नवे कोरोना रुग्ण; 13 मृत्यू

pradnya p

अनिश्चित काळासाठी इंटरनेटबंदी अयोग्य

Patil_p

शोपियां चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

लहान भावाने पब्जी खेळण्यास मोबाईल न दिल्याने मोठ्या भावाची आत्महत्या

pradnya p

चित्रपट अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे कर्करोगाने अमेरिकेत निधन

triratna

शक्तिप्रदर्शनाद्वारे दीदींचा अर्ज दाखल

Patil_p
error: Content is protected !!