तरुण भारत

राज्यात 10 नवे रुग्ण

म्हैसूरमधील 5 जणांचा समावेश : रोनाबाधितांची संख्या 207 वर

प्रतिनिधी / बेंगळूर

Advertisements

राज्यात कोरोना संसर्गबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून शुक्रवारी त्यात 10 जणांची भर पडली. त्यामध्ये म्हैसूरमधील 5 जणांचा समावेश आहे. म्हैसूरमध्ये आतापर्यंत 41 जण कोरोनाचे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी 26 जण नंजनगूडमधील ज्युबिलीयंट फार्मा कंपनीतील कर्मचारी आहेत. तर 5 त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. तसेच 8 जण दिल्लीच्या तबलिग जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. राज्यात शुक्रवारी दुपारपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 207 वर पोहोचली.

म्हैसूरमध्ये 5, बेंगळूर शहर आणि बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ात प्रत्येकी दोन आणि गुलबर्ग्यामध्ये एक रुग्ण शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळून आला आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने हेल्थ बुलेटीनद्वारे दिली आहे. राज्यात आतापर्यंत 34 जण संसर्गमुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कारवार बंदरावर 8 जणांची आरोग्य तपासणी करून क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

बेंगळूरमध्ये 150 पैकी 147 तबलिगी निगेटिव्ह

तबलिग जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या बेंगळूरमधील 150 जणांपैकी 147 जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तिघांनाच कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती हज भवनच्या क्वारंटाईन केंद्राचे नोडल अधिकारी एजाझ अहमद यांनी दिली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांवर व्हिक्टोरिया आणि राजीव गांधी इस्पितळात आयसोलेशन वॉर्डात उपचार केले जात आहे. 114 जणांना स्वयंसेवकांच्या मदतीने घरी पाठविण्यात आले आहे. उर्वरित 33 जणांपैकी 10 जण इंडोनेशिया, 9 जण किर्गिस्तान, एक सुदान, 10 जण केरळ तसेच केरळ आणि बिहारमधील प्रत्येकी एकाला त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे एजाझ अहमद यांनी सांगितले.

चामराजनगरमध्ये 83 जणांचे अहवाल निगेटिव्ह

चामराजनगरमध्ये तबलिग जमातच्या सभेत सहभागी झालेल्या 97 जणांपैकी 83 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 14 जणांना शहरातीलट डॉ. आंबेडकर भवनमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे अहवाल म्हैसूरच्या प्रयोगशाळेकडून दोन दिवसांत उपलब्ध होतील, असे जिल्हाधिकारी रवी यांनी दिली.

कोरोनाचे हॉटस्पॉट होणार ‘सीलडाऊन’?

राज्यात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जारी आहे. ही मुदत संपण्यासाठी तीन दिवस शिल्लक आहे. पण कोरोनावर नियंत्रण येत नसल्याने लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी बेंगळूरमधील दोन वॉर्ड ‘सीलडाऊन’ करण्यात आले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा अधिक असलेल्या राज्यातील इतर भागांमध्ये देखील सीलडाऊन जारी होण्याची शक्यता आहे.

बेंगळूरमध्ये कोरानाग्रस्तांची संख्या 71 वर पोहोचली आहे. त्यामुळे चामराजपेठ मतदारसंघातील बापूजीनगर आणि पादरायनपूर वॉर्ड सीलडाऊन करण्यात आले आहेत. दोन्ही वॉर्डांमध्ये प्रत्येकी 5 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. शनिवारी आणखी काही वॉर्ड सीलडाऊन होणार असल्याचे सांगण्यात येते. राज्यात हॉटस्पॉट असलेले भाग देखील सीलडाऊन करण्याचा विचार सरकारचा आहे. त्यामुळे अशा भागांमध्ये लोकांना कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडता येणार नाही. जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याची व्यवस्था सरकारकडूनच केली जाणार आहे. आशा कार्यकर्त्या, परिचारिका घरोघरी जाऊन कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची आरोग्य तपासणी करतील. त्यांना पोलिसांकडून संरक्षण पुरविण्यात येईल. तपासणीवेळी जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्यांना होम क्वारंटाईक केले जाणार आहे.

Related Stories

तेलंगणात टीआरएस, भाजप अन् काँग्रेसची अग्निपरीक्षा

Patil_p

महाराष्ट्रातील 54 पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक

prashant_c

वाणिज्य करार : भारत-चिली चर्चा अंतिम टप्प्यात

Omkar B

घाऊक महागाई दरात किरकोळ घट

Patil_p

निर्भयाच्या पालकांचा आक्रोश

Patil_p

देशात दिवसभरात 60,753 नवे रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!