तरुण भारत

कुडचीत आजपासून तीन दिवस पूर्ण बंद

वार्ताहर/ कुडची

तालुक्यातील कुडची येथे 11 ते 13 एप्रिलअखेर पूर्णत: लॉकडाऊन करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आज दि. 10 रोजी सायंकाळी पोलीस ठाण्याच्या आवारात आयोजित नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी, नगरपरिषदेचे अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

Advertisements

लॉकडाऊन काळात दवाखाने, मेडिकल दुकाने व दूध अशा अत्यावश्यक सेवा वेळेचे बंधन घालून पुरविण्यात येणार आहेत. कुडची येथे चार रुग्ण आढळल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला. सकाळी 9 ते 12 पर्यंत दूध उपलब्ध करण्यात येणार आहे. दवाखाने व मेडिकल दुकाने 9 ते 1 पर्यंत सुरू राहणार आहे. या व्यतिरिक्त शहर पूर्णपणे लॉकडाऊन होणार आहे. तीन दिवसांच्या लॉकडाऊननंतर प्रत्येक प्रभागात 15 स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांच्याकडूनच आवश्यक ते साहित्य सकाळी सहा ते आठ या वेळेत मिळणार आहे. या स्वयंसेवकांना पास दिले जाणार आहेत.

तीन दिवसाच्या लॉकडाऊन काळात शहरवासियांनी सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. पोलीस, प्रशासन व नगरपरिषदेच्या अधिकाऱयांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले. नगरसेवकांनी आपल्या सूचना मांडल्या.

बैठकीला अथणीचे पोलीस उपअधीक्षक एस. व्ही. गिरीश, कुडचीचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज दरीगौड, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एस. ए. महाजन यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. 

Related Stories

चिकोडी रोड-रायबाग दुपदरीकरणाचे काम पूर्ण

Patil_p

धारवाड रोड उड्डाणपुलाशेजारील वाहिनीमुळे अपघात

Amit Kulkarni

चेकपोस्टची आचारसंहिता नोडल अधिकाऱयांकडून पाहणी

Patil_p

विजापूर जिल्हय़ात 81 अहवाल निगेटिव्ह

Patil_p

कोरोना लस, ब्लॅक फंगसच्या औषधांबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

Rohan_P

ड्रेनेज चेंबरवर पेव्हर्सचा थर

Patil_p
error: Content is protected !!