तरुण भारत

आता क्वारंटाईनसाठी मंगल कार्यालयांचे बुकिंग

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनाचा प्रसार वाढत चालल्याने रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांसह नागरिकांना होम क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. विविध हॉटेल्समध्ये या नागरिकांना ठेवण्यात आले असून याला स्थानिक नागरिकांचा विरोध वाढत आहे. तसेच आगामी काळात होम क्वारंटाईनची संख्या वाढण्याची शक्मयता गृहीत धरून  त्यांची सोय मंगल कार्यालयांमध्ये करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याकरिता मंगल कार्यालयांची यादी देखील बनविण्यास प्रारंभ झाला आहे. 

Advertisements

कोरोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबीयांसह संपर्कात आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्यांसह निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यास होम क्वारंटाईन नागरिकांची संख्या देखील वाढण्याची शक्मयता आहे. त्यामुळे आवश्यक तयारी महापालिका प्रशासनातर्फे चालविली आहे. सध्या विविध ठिकाणी असलेल्या हॉटेल्समध्ये नागरिकांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. होम क्वारंटाईन घोषित करण्यात आलेल्या नागरिकांना  ठेवण्यासाठी आणखी काही हॉटेल्सची यादी तयार करण्यात आली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी याला जोरदार विरोध चालविला आहे. विलगीकरण कक्षातच किंवा शहराबाहेर संशयितांना ठेवण्यात यावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मंगलकार्यालयांची यादी तयार करण्यास प्रारंभ केला आहे.

शहर आणि उपनगरांमधील सर्व मंगलकार्यालयांची यादी तयार करून उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेण्यात येत आहे.  त्याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. संशयित रुग्णांची संख्या वाढल्यास मंगलकार्यालयांचा उपयोग  करून घेण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Stories

बाजारपेठेतील वाहतूक केंडी चिंताजनक

Omkar B

दहावी परीक्षेची रंगीत तालीम यशस्वी

Patil_p

‘ट्वेंटी-ट्वेंटी’ स्टाईल लढतीत भाजपची बाजी

Amit Kulkarni

बुडा कॉलनीतील जलतरण तलावाचे काम रखडले

Amit Kulkarni

कलाकाराला भूमिकेचे मर्म ओळखता आले पाहिजे !

Amit Kulkarni

कंग्राळ गल्लीत डेनेज घालण्याचे काम सुरू

Amit Kulkarni
error: Content is protected !!