तरुण भारत

बँकांकडून वसुली सुरुच, ग्राहक धास्तावले

रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनंतरही कर्ज हप्त्याची नियमीतपणे वसूली, कर्जदारांकडे वसूलीचा तगादा कायम

कृष्णात चौगले/कोल्हापूर

Advertisements

कोरोनाच्या प्रादुर्भावाने बिघडलेले अर्थिक गणित पाहता बँकांनी कर्जफेडीच्या हप्त्याची वसूली तीन महिन्यांनी पुढे ढकलावी अशी सूचना रिझर्व्ह बेँकेने सर्व बँकांना केली आहे. त्यामुळे एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे हप्ते बँकांकडून वसूल केले जाणार नाही अशी कर्जदार ग्राहकांची अपेक्षा होती. पण बहुतांशी बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या सूचनेला पायदळी तुडवत वसूली सुरुच ठेवली आहे. 22 मार्चपासून सर्व उद्योगधंदे, व्यवसाय बंद असल्यामुळे अर्थिक उलाढाल पूर्णपणे ठप्प आहे. अशा बिकट परिस्थितीतही बँकांनी कर्जाचे हप्ते वसूल करण्याचा तगादा सुरुच ठेवल्यामुळे कर्जदारांची तारांबळ उडाली आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक कर्जाचे हप्ते भरण्यासाठी जूनअखेरची मुदत दिली आहे. परिणामी ज्या शेतकऱयांनी गतवर्षी पीक कर्जाची उचल केली आहे, त्यांना त्याची परतफेड करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदत मिळाली आहे. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱयांसाठी असणाऱया सन्मान निधी योजनेमध्ये पात्र ठरण्यासाठी अनेक शेतकऱयांना चांगली संधी मिळाली आहे. तसेच 2 लाखांपेक्षा जास्त पिक कर्ज असणाऱया थकबाकीदार शेतकऱयांनाही दोन लाखांवरील रक्कम भरण्यासाठी मुदत मिळणार आहे. त्यामुळे त्यांनाही शासनाच्या पिक कर्जमाफीमध्ये पात्र ठरण्यासाठी थोडी उसंत मिळाली आहे. पण इतर सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांचा विचार केल्यास त्यांच्याकडून वसुलीचा तगादा सुरुच आहे. कर्जदाराचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता त्यांच्या घरापर्यंत जाऊन वसूली केली जात आहे. बँकांच्या या पवित्र्यामुळे कर्जदार धास्तावले आहेत.

लॉकडाऊनमुळे सर्वच समाजघटकांचे अर्थिक गणित कोलमडले आहे. उत्पन्नाचे स्त्राsत्र थांबले आहेत. त्यांच्यासाठी तीन महिन्याचे ईएमआय भरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मुदतवाढ देण्याची बँकांना सूचना दिली आहे. तसेच त्याचे व्याज तीन समान हप्त्यात पुढील हप्त्यात घेता येणार आहे. याचा फायदा नियमित हप्ते भरणाऱयांना होणार आहे. कोणतेच आर्थिक उत्पन्न नसणाऱया व हातावर पोट असलेल्यांना कर्जाचा हप्ता कसा भरायचा ? याची चिंता आहे. जे प्रामाणिक हप्ते भरतात त्यांना याचा फायदा होणार आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांचा विचार केल्यास ज्यांनी आपले हप्ते फेब्रुवारीअखेर भरले आहेत, त्यांनाच पुढील तीन महिन्याचे हप्ते भरण्यासाठी मुभा दिली जाणार असल्याची चर्चा आहे. विशेषतः हे हप्ते माफ नसून हे भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. पण मायक्रो फायनान्स कंपन्या आणि बँकांनी गृहकर्ज, वाहनकर्ज अथवा इतर अनेक कर्जांचे 3, 5 आणि 7 वर्षांचे महिना निहाय समान हप्ते पाडले आहेत. बहुतांशी बँका, पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांकडून या हप्त्यांची वसूली सुरुच आहे.

अर्थिक स्थिती चांगली असणाऱयांनी हप्ते भरण्याची गरज

ज्या कर्जदारांची अर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांनी कर्जाचे हप्ते भरावेत असे आवाहन बँकींग क्षेत्रातील अधिकाऱयांनी केले आहे. पण ज्यांच्याकडे खरोखरच हप्ते भरण्याची ऐपत नाही, त्यांच्याकडून बँकांनी सक्तीने वसूली करू नये अशी मागणी कर्जदारांकडून होत आहे. कोरोनाच्या संकटातून सावरत असताना बँकेच्या अधिकाऱयांनी कर्जदारांना समजावून घ्यावे, त्यांच्या अडचणी जाणून घेत रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार हप्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत द्यावी असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय पाटील यांनी केले आहे.

व्याजाची रक्कम मुद्दलमध्ये जमा होणार

केंद्रसरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यामुळे देशातील सर्व उद्योगधंदे, व्यवसाय बंद आहेत. याचे आगामी काळात गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळे तीन महिने कर्जाचे हप्ते स्थगित करण्याचा पर्याय रिझर्व्ह बँकेने सर्व बँका आणि वित्तीय संस्थांना सुचवला आहे. त्यानुसार काही बँकांनी त्याची अंमलबजावणीही सुरु केली आहे. यामुळे कर्जदाराची तात्पुरती सोय होणार असली तरी व्याजाची रक्कम मुद्दलमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे दिर्घकालीन कर्जपरतफेड महागडी ठरणार आहे.

Related Stories

शिवाजी विद्यापीठातील १२ एप्रिल पर्यंतच्या परीक्षा पुढे ढकलणार

Abhijeet Shinde

महापालिकेच्या आरोग्य विभागाचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ !

Abhijeet Shinde

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मर्यादित उद्योग सोमवारपासून सुरू

prashant_c

कोडोलीतील कॅप्टन अभिजीत बिचकरची लष्करात पायलटपदी निवड

Abhijeet Shinde

पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणे हा राज्यातील 33 टक्के जनतेचा विश्वासघात – नितीन राऊत

Abhijeet Shinde

तत्कालिन जिल्हाधिकारी, तहसीलदारांनीच धान्य घोटाळा केला

Patil_p
error: Content is protected !!