तरुण भारत

लॉकडाऊनच्या काळात दारूची विक्री करणार्‍या 8 दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे यांची धडक कारवाई

प्रतिनिधी/ उस्मानाबाद

Advertisements

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी करण्यात आली असतानाही जिल्ह्यात कांही ठिकाणी दारूची दुकाने उघडी ठेवून राजरोसपणे मद्य विक्री करणार्‍या 8 बिअर बार व परमीट रूमचे परवाने जिल्हाधिकारी दिपा मुधोळ -मुंडे यांनी कायमस्वरूपी रद्द केले आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सीमा बंदी करण्यात आलेली आहे. तरीदेखी मद्याच्या पासेसच्या नोंदी न ठेवणे, परराज्यातील व गोवा निर्मित मद्य विक्री करणे शासनाच्या नियमांचे व अटीचे पालन न केल्याने सदरची कारवाई जिल्हाधिकार्‍यांनी केली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील घोगरेवाडी येथील हॉटेल पृथ्वीराज बिअरबार, ढोकी येथील सुर्या बिअरबार व शिरीन बिअरबार, कळंब तालुक्यातील शिराढोण येथील हॉटेल भक्ती बिअरबार, उमरगा तालुक्यातील हॉटेल प्राची, भूम येथील हॉटेल सचिन बार व लोहारा येथील जट्टे बिअर शॉपीचे परवाने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्यात येथून पुढे जर कोणते बार व परमिट चालकांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावरही वरीलप्रमाणे कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक केशव राऊत यांनी दिला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, बार चालक व परमिट चालकांमध्ये सध्या धास्तीचे वातावरण दिसून येत आहे.

Related Stories

NEET परीक्षेला माझा विरोध नाही, पण गरीब विद्यार्थी मागे पडू नये – रोहित पवार

triratna

बेलवडे हवेतील उसाच्या फडात सापडले बछडे

Patil_p

कोगे – कुडित्रे जुना बंधारा पाण्याखाली ; नवीन पुलाने नागरिकांची गैरसोय दूर

triratna

विकासकामांबाबत अजितदादा राजकारण करत नाहीत: आमदार शिवेंद्रराजे

triratna

कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदासाठी 23 रोजी परीक्षा

triratna

सातारा : शिक्षकांच्या शाळेमुळे बदली प्रक्रिया लांबली

triratna
error: Content is protected !!