तरुण भारत

जिल्हय़ात 452 जण विलगीकरणात

आणखी सहाजणांचे रिपोर्ट निगेटिव्ह : आठ नमुने तपासणीसाठी मिरजला

  • आयसोलेशन वॉर्डमध्ये तीन नवीन रुग्ण दाखल
  • 106 व्यक्ती झाल्या होमक्वारंटाईन मुक्त

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

Advertisements

कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या आणखी सहा नमुन्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर आणखी आठ नमुन्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये आणखी तीन रुग्णांना दाखल करण्यात आले असून एकूण 29 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हय़ात आतापर्यंत 452 व्यक्ती विलगीकरणात असून त्यापैकी 380 व्यक्तींना घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. तर संस्थात्मक विलगीकरणामध्ये 72 व्यक्ती असून 106 व्यक्तींना होमक्वारंटाईन मुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये आणखी तीन रुग्ण वाढल्यामुळे 29 रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या आणखी सहाजणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत एकूण 82 नमुने पाठविण्यात आले असून त्यापैकी 74 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये 73 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. एका रुग्णाचाच रिपोर्ट फक्त पॉझिटिव्ह अहवाल आला होता. आता त्याही रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याने त्या रुग्णाला डिस्चार्जही देण्यात आला आहे. तर आठ नमुन्यांचा अहवाल अजून प्राप्त झाला नसल्याने या अहवालांची प्रतीक्षा आहे.

आरोग्य यंत्रणेमार्फत आज 1795 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून जिल्हय़ामध्ये ताप व खोकल्याच्या रुग्णांचे सक्रीय सर्वेक्षण सुरू आहे. जिल्हय़ातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना नियमित मिळणाऱया 35 किलो धान्याव्यतिरिक्त पाच किलो प्रति व्यक्ती धान्य मोफत देण्यात येत आहे. तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती तीन किलो गहू आठ रुपये प्रति किलो दराने आणि दोन किलो तांदूळ 12 रुपये दराने मिळणार आहेत.

जिल्हय़ातील स्थलांतरित, बेघर, मजूर व कामगारांसाठीच्या कॅम्पमध्ये असलेल्यांची प्रशासनातर्फे योग्य ती काळजी घेण्यात येत असून त्यांच्या जेवणाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जेवण व नाष्टय़ा व्यतिरिक्त त्यांना लागणाऱया वस्तू जसे टुथपेस्ट, साबण यांचाही पुरवठा करण्यात येत आहे.

घरीच अलगीकरण                     380

संस्थात्मक अलगीकरण   072

पाठविलेले एकूण नमुने   082

अहवाल प्राप्त नमुने                    074

पॉझिटिव्ह आलेले नमुने  001

निगेटिव्ह आलेले नमुने   073

अलवाल न मिळालेले नमुने         008

विलगीकरण कक्षात दाखल          029

सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण       000

शनिवारी तपासणी झालेल्या व्यक्ती          1795 

Related Stories

पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर योजनेचा लाभ देणार!

NIKHIL_N

नाटय़चळवळ अविरत सुरू ठेवा!

NIKHIL_N

नेतर्डेची दिपश्री नाईक जिल्हास्तरावर प्रथम

Ganeshprasad Gogate

टाळेबंदीतून एमआयडीसीतील उद्योगांना सूट मिळणार?

Patil_p

रत्नागिरी (संगमेश्वर) : कळंबस्ते येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Shinde

कोरोनाशी काळय़ा फितीने आशांची लढाई!

NIKHIL_N
error: Content is protected !!