तरुण भारत

जलतरणपटू साजन प्रकाश थायलंडमध्ये सुखरूप

थायलंडमध्ये सुखरूप / वृत्तसंस्था/ बेंगळूर

भारताचा ऑलिंपिक जलतरणपटू साजन प्रकाश थायलंडमधील फुकेत येथे सुखरूप असल्याचे भारतीय जलतरण संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे साजन प्रकाश आणखी काही दिवसांसाठी थायलंडमध्ये राहणार आहे.

Advertisements

जलतरणपटू साजन प्रकाशचे सलग दुसऱयांदा ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचे स्वप्न आहे. आता या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी त्याला आणखी एक वर्ष थांबावे लागेल. फुवेतमधील फिनाच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये सध्या त्याचे वास्तव्य आहे. या प्रशिक्षण अकादमीमध्ये हंगेरीच्या जलतरणपटूंचाही समावेश आहे. सदर जलतरणपटू मायदेशी परतल्यानंतर त्यांची कोरोना चांचणी घेण्यात आली. त्यावेळी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे जाणवले. फुकेतच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये 15 ते 20 जलतरणपटूंचा गट सहभागी झाला होता. त्यापैकी 9 जलतरणपटू हंगेरीला परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे साजन प्रकाशने सांगितले. 12 मार्च रोजी हंगेरीचे हे जलतरणपटू मायदेशी रवाना झ्घल्यानंतर 17 मार्च रोजी फिनाचे हे जलतरण प्रशिक्षण केंद्र बंद करण्यात आले. ते केंद्र संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले असून हॉस्टेलमधील कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाण्याला बंदी घालण्यात आली आहे. फुकेतमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 161 झाल्याचे साजन प्रकाशने सांगितले. फुकेतमध्ये आपण सुखरूप असलयाचे साजन प्रकाशने कळविले आहे.

Related Stories

विराट-स्मिथला सर्व क्रिकेट प्रकारात मागे टाकण्याचे लाबुशानेचे लक्ष्य

Patil_p

अश्विनी-सिक्की, लक्ष्य सेन यांचे आव्हान संपुष्टात

Patil_p

नेपोमनियाचीचे अग्रस्थान कायम

Patil_p

तामिळनाडू- बडोदा यांच्यात आज जेतेपदासाठी लढत

Patil_p

विदित गुजराथी जिंकला पण भारताची बरोबरी

Patil_p

रियल माद्रीदला हरवून चेल्सी अंतिम फेरीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!