तरुण भारत

सुमूलने दूध संकलन दर कमी केल्याने दुग्ध उत्पादक अडचणीत

प्रतिनिधी/ पणजी

सुमूल दुग्ध उत्पादक संस्थेने अचानकपणे दूध संकलनाचा दर प्रतिलिटर 2.80 पैशांनी कमी केल्याने राज्यातील सुमारे 500 ते 600 शेतकरी अडचणीत आलेले आहेत. प्रत्यक्षात शेतकऱयांना सरकारची होणारी मदत विचारात घेता प्रतिलिटर 4 असा फटका बसलेला आहे.

Advertisements

सुमूल या दुग्ध उत्पादक संस्थेने गोव्यातील शेतकऱयांना अनेक आश्वासने देत व जादा दर देऊन दूध खरेदी करण्यात प्रारंभ केला. गोवा डेअरीच्या तुलनेत जादा दर मिळू लागल्याने शेतकरी मोठय़ा प्रमाणात सुमूलकडे आकर्षित झाले. त्याचा सुमूलला चांगला लाभ झाला व गोवा डेअरीकडील शेतकरी मोठय़ा प्रमाणात सुमूलकडे आकर्षित झाले. सध्या सुमूलकडे सुमारे 500 ते 600 शेतकरी आहेत. त्यांच्याकडून दररोज 20 हजार लिटर दूधाचे संकलन केले जाते.

शेतकऱयांना गोवा सरकारकडून 40 टक्के सबसिडी मिळते. सध्या सुमूलने प्रतिलिटर 2.80 रुपये दर कमी केल्याने गोवा सरकारकडून त्यावर मिळणारी एकूण सबसिडी विचारात घेता सर्वसाधारणपणे प्रतिलिटर 4 रुपयांचा थेट फरक पडतो. शेतकरीवर्ग सध्या फार अडचणीत सापडलेला आहे. अगोदरच वाहतुकदारांनी दरवाढ केलेली आहे. पशुखात्याचे दर त्यामुळे प्रतिकिलो 2 रुपये वाढलेले आहे. याचा शेतकऱयांना प्रतिलिटर दूध उत्पादनात 2 रुपयांचा थेट फटका बसलेला आहे.

राज्य  सरकारने या प्रकरणात लक्ष घालून सुमुलला आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकरीवर्गाने केली आहे.

Related Stories

संजीवनी कारखान्याच्या आवारात उद्या ऊस उत्पादकांचे धरणे

Patil_p

म्हाऊस, भिरोंडा, पिसुर्ले पंचायत पोटनिवडणुकीत 6 उमेदवारी अर्ज दाखल

Amit Kulkarni

रोजगार देईल, समस्या सोडवेल असे सरकार निवडून आणा

Amit Kulkarni

खनिज वाहतुकीत दरवाढ मिळेपर्यंत ट्रक रस्त्यावर धावणार नाहीत !

Patil_p

मुख्यमंत्री सहायता निधीतून पावणे कुटुंबाला आर्थिक मदत प्रदान

Patil_p

नाणूस गोशाळेतील परिस्थितीची मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून पाहणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!