तरुण भारत

लॉकडाऊनच्या काटेकोर पालनासाठी पोलीस अधिकाऱयांचे जीवाचे रान

काही ठिकाणी ड्रोन तर काही ठिकाणी पायपीट

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

कोरोना थोपविण्यासाठी लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली आहे. लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधिकाऱयांना जीवाचे रान करावे लागत आहे. त्यांनाही कोरोनाचा धोका आहेच तरीही बेळगावकरांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत.

कोण ड्रोनचा वापर करून आपल्या कार्यक्षेत्रातील घडामोडींवर नजर ठेवत आहेत तर आणखी कोणी पायपीट करीत नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळात चहा, नाश्ता, जेवण मिळणेही कठीण झाले आहे. तरीही या सर्व अडचणींवर मात करत पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत.

एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी आपल्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात सहकाऱयांना सोबत घेऊन पायपीट करीत जनजागृतीबरोबरच नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी घरीच बसण्याचा सल्ला देत आहेत. शनिवारी कंग्राळी खुर्द येथे त्यांनी फूट पेट्रोलिंग केले. आपले वाहन एका ठिकाणी उभे करून संपूर्ण गावात त्यांनी फेरफटका मारला.

आझमनगर, संगमेश्वरनगर, वैभवनगर, शाहूनगर, नेहरूनगर, हनुमाननगर परिसरातही आपल्या सहकाऱयांना घेऊन पायी चालतच जावेद मुशापुरी यांनी जनजागृतीचा सपाटा चालविला आहे. जे काम लाठीने होत नाही ते पायपीट करीत सर्वसामान्य माणसांचा संपर्क वाढल्यावर जमते ही गोष्ट उमगल्याने त्यांनी पायपीटीचा मार्ग अवलंबिला आहे.

मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनीही शनिवारी आपल्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात ड्रोनचा प्रयोग केला. एका ठिकाणी थांबून ड्रोनच्या माध्यमातून लॉकडाऊनची अंमलबजावणी होते आहे की नाही, हे पाहण्यासाठी आता बहुतेक पोलीस अधिकारी ड्रोनचा वापर करताना दिसत आहेत.

51 वाहने जप्त

लॉकडाऊनचे उल्लंघन करून अनावश्यकपणे रस्त्यावरून फिरणारी 51 वाहने शनिवारी जप्त करण्यात आली आहेत. गुन्हे तपास विभागाचे एसीपी महांतेश्वर जिद्दी यांनी ही माहिती दिली आहे. यामध्ये 49 दुचाकी, 1 ऑटोरिक्षा व 1 कारचा समावेश आहे

लोकवस्तीत क्वारंटाईनसाठी विरोध

लोकवस्तीतील लॉजमध्ये संशयितांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याच्या प्रकाराला स्थानिक नागरिकांचा विरोध होत आहे. शुक्रवारी रात्री कॉलेज रोडवरील एका लॉजमध्ये सहा महिलांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. देवदर्शनावरून परतताना रेल्वेने प्रवास करणाऱया या महिलांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तोपर्यंत त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांनी स्थानिक नागरिकांची मनधरणी केली.

Related Stories

तीन परप्रांतीयांसह कारखानदारावर गुन्हा दाखल, विनापरवाना कागल शहरात प्रवेश

Abhijeet Shinde

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटी ; बावीस हजार क्यूसेसने विसर्ग वाढवला

Abhijeet Shinde

पूरनियंत्रणासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर व्हावा

Patil_p

जगात निर्दोष शासक मिळणे कठीण आहे

Rohan_P

कोल्हापूर : कुरुंदवाडमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तूचे पार्सल आढळल्याने खळबळ

Abhijeet Shinde

तृणमूल-भाजपच्या लढाईत डाव्यांची भूमिका महत्त्वाची

Patil_p
error: Content is protected !!