तरुण भारत

अमेरिकेत कोरोनाचे मृत्यूतांडव

आतापर्यंत 20 हजारांहून अधिक जणांचा बळी

ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :

Advertisements

   अमेरिकेसारख्या बलाढ्य देशही कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे अमेरिकेत दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, मृतांच्या आकडेवारीचा आलेखही चढाच आहे. अमेरिकेत आतापर्यंत 5 लाख 33 हजार 115 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 20 हजार 580 जणांचा मृत्यू झाला आहे. 

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. इटलीला मागे टाकत अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या 20 हजारांपार गेली आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात करोनाचा सर्वाधिक संसर्ग होत आहे. न्यूयॉर्कमध्ये 1 लाख 80 हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, 8600 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क पाठोपाठ न्यूजर्सीमध्ये करोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. न्यूजर्सीमध्ये 58 हजारजणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर, 2100 जणांचा मृत्यू झाला आहे.  

इटलीमध्ये 1 लाख 52 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर 19 हजार 468 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोना संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.

Related Stories

तालिबानकडून घराघरातून मुलींचा शोध

Patil_p

स्थलांतरित कामगारांना सरकारचा दिलासा

Patil_p

भाजपला मतं द्या, 50 रुपयांत दर्जेदार दारू देऊ

datta jadhav

अंबानींच्या घराबाहेरच्या घटनेचे नाट्यरुपांतर; सचिन वाझे यांना कुर्ता घालून लावले चालायला

Rohan_P

गडचिरोली : खोब्रामेंढा जंगलातील चकमकीत 5 नक्षलवादी ठार

Rohan_P

दोन मिनिट मौन पाळत योगी आदित्यनाथ यांनी वडिलांना वाहिली श्रद्धांजली

prashant_c
error: Content is protected !!