तरुण भारत

उचतमधील दोन बाधितांच्या संपर्कात 420 जण

तरुण व त्याच्या आईच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरुच

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील कोरोनाबाधित तरुण व त्याच्या आईच्या संपर्कात तब्बल 420 नागरिक आले आहेत. यामध्ये बाधित तरुणाच्या प्रथम संपर्कात 70 तर द्वितीय संपर्कात 283 जण आले आहेत. तर 67 नागरिक त्याच्या आईच्या प्रथम संपर्कात आले आहेत. या सर्वांचे अलगीकरण केले आहे. आणखी किती व्यक्ती या दोघांच्या संपर्कात आल्या आहेत याचा जिल्हा परिषदेच्या कॉन्टॅक्ट सेलच्या माध्यमातून अद्याप शोध सुरु आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे उचत गावापासूनचा सात किलोमीटरच्या परिसरात नाकाबंदी केली असून प्रशासन सतर्क झाले आहे.

बाधित तरुणाच्या प्रथम सहवासात आलेल्या 70 जणांची तपासणी केली असून त्यापैकी 30 जणांना इन्स्टीटय़ूट क्वॉरंटाईन केले असून 40 जणांचे होम क्वॉरंटाइन  केले आहे. या 70 जणांपैकी कोणालाही कोरोनाची लक्षणे जाणवत नसली तरी त्यापैकी 7 जणांच्या घशाचे स्वॅब घेतले आहेत. तर 283 जण त्याच्या द्वितीय संपर्कात आले आहेत. या सर्वांना होम क्वॉरंटाइन केले आहे. तरुणाच्या आईच्या प्रथम सहवासात आलेल्या 67 जणांचे होम क्वॉरंटाइन केले आहे. अद्याप त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळलेली नसून त्यांच्या घशाचे स्वॅब घेतलेले नाहीत. अद्याप त्या महिलेच्या द्वितीय सहवासातील लोकांचा शोध सुरु आहे.

Related Stories

सातवेत ऊसाचा फड पेटवताना शेतकऱ्याचा मृत्यू

Abhijeet Shinde

यशवंत डांगे यांची बदली रद्द करा

Patil_p

गोकुळ दूध संघ व दि न्‍यु इंडिया एश्‍योरन्‍स कंपनीकडून दूध उत्‍पादक शेतकऱ्यास दिलासा

Abhijeet Shinde

माढा तालुक्यात कोरोना बाधितांचा उच्चांक; तब्बल ५४ बाधितांची वाढ

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ई वॉर्डातील ८ प्रभागात बायपासने पाणीपुरवठा

Abhijeet Shinde

सातारा शहरात पाण्याचा ठणाणा

Patil_p
error: Content is protected !!