तरुण भारत

निर्जंतुकीकरण टनेल ठरू शकतो धोकादायक

भारतात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी डिसइन्फेक्शन टनेल निर्माण करण्यात आले आहेत. भुयारवजा या जागेतून जाणाऱया व्यक्तींवर चहुबाजूने औषधांचा मारा केला जातो. या टनेलमधून जाणारा व्यक्ती क्लोरिन तसेच अल्कोहोलच्या प्रभावामुळे बऱयाच प्रमाणात कोरोना संसर्गापासून वाचू शकतो असा दावा संबंधित संस्थेने केला आहे.

क्लोरिन, अल्कोहोल आणि लायजोलचा मानवी शरीरावर हानिकारक प्रभाव पडतो. या रसायनांचा माणसावर विपरित प्रभाव दिसून येत असल्याचा दावा तामिळनाडूच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने केला आहे. सर्व डिसइन्फेक्शन टनेल पूर्णपणे बंद करण्याची सूचना तामिळनाडूच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालकांनी केली आहे.

Advertisements

डिसइन्फेक्शन टनेलमधून बाहेर पडणाऱया व्यक्तीमध्ये कोरोनापासून बचावल्याची धारणा तयार होऊ शकते. यातून तो हात धुण्यासारख्या आवश्यक उपायांना त्यागू शकत असल्याने प्रतिकूल परिणाम दिसून येण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱयाने म्हटले आहे. चेन्नईमध्ये अनेक ठिकाणी डिसइन्फेशक्न टनेल निर्माण करण्यात आले असून अनेक लोक त्याचा वापरही करत आहेत.

Related Stories

गुजरातमध्ये भाजपचा प्रचंड विजय

Patil_p

हरियाणा : कोरोना टेस्टच्या दरात कपात

pradnya p

मे-जूनमध्ये गरिबांना मोफत धान्य

Patil_p

पीडीपीच्या तीन प्रमुख नेत्यांचा राजीनामा

datta jadhav

मुख्यमंत्री येडियुराप्पांचे गृहकार्यालय सीलडाऊन

Patil_p

देशात 13,788 नवे बाधित, 145 मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!