तरुण भारत

अहमदाबादमध्ये विनामास्क फिरणाऱयांना तीन वर्ष कारावास

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

गुजरातमध्ये कोरोना विषाणू संसर्ग वेगाने होत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेने कठोर नियमावली केली आहे. यापुढे शहरात सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱयांना पाच हजार रुपयांचा दंड किंवा तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येईल, असा ठरावच महापालिकेने मंजूर केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. महासाथ प्रतिबंध कायद्यान्वये ही नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. सोमवार 13 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती पालिकेचे आयुक्त विजय नेहरा यांनी दिली. शहरात 266 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

Related Stories

…….. कुटुंब नियोजनाची सक्ती अशक्य

Patil_p

मुंबईतून १५ कोटी रुपयांच्या रक्तचंदनाची तस्करी

Sumit Tambekar

सीडीएस रावत यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे दुर्घटनाग्रस्त

Patil_p

दिलासा : सलग 21 व्या दिवशी पेट्रोल – डिझेलचे दर ‘जैसे थे’

Rohan_P

चीनी वस्तूंवर बहिष्काराला मारूती, बजाजचा विरोध

Patil_p

दूरसंचार कंपन्यांच्या हिशेबांची फेरतपासणी करण्यास नकार

Patil_p
error: Content is protected !!