तरुण भारत

पंजाब : तलवारीने कापलेल्या ‘त्या’ अधिकाऱ्याचा हात जोडण्यात डॉक्टरांना यश

ऑनलाईन टीम / चंदीगड :

 पंजामधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरजित सिंग यांचा तोडलेला हात पुन्हा जोडण्यास डॉक्टरांना यश मिळाले आहे. अशी माहिती पंजाब चे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ट्विटर च्या माध्यमातून दिली.

Advertisements

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगभरात लॉग डाऊन सुरू आहे. लॉक डाऊन असताना रस्त्यावर फिरत असणाऱ्या एका टोळक्याने तलवारीने पोलिसाचा हात कापून टाकल्याची धक्कादायक घटना काल पंजाब मध्ये घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर आपला तोडलेला हात घेऊन हरजित सिंग लगेचच रुग्णालयात गेले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या सात तासाच्या प्रयत्नानंतर त्यांचा हात पुन्हा जोडण्यास यश मिळाले. 

अमरिंदर सिंग आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, मला सांगण्यास आनंद होत आहे. डॉक्टरांच्या सात तासाच्या प्रयत्नानंतर हरजित सिंग यांचा तुटलेला हात जोडण्यास सफलता मिळाली आहे. मी सर्व डॉक्टर्स टीम चे आभार मानतो. तसेच हरजित सिंग यांची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो.

काल झालेल्या हल्ल्यानंतर त्या टोळीला पोलिसांनी शरण येण्यास सांगितले होते.  मात्र त्यांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. त्यानंतर पोलीस व आरोपी यांच्यात गोळीबार झाला. त्यानंतर पोलिसांनी सातही आरोपींना अटक केली आहे. 
.

Related Stories

लसीकरणसंबंधी हेल्पलाईन जारी

Patil_p

ब्रेकिंग : पुण्यात केमिकल कंपनीत अग्नितांडव; 17 कामगारांच्या मृत्यूची शक्यता

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात मागील 24 तासात 53,249 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

शरद पवारांच्या गोविंद बाग निवासस्थानी सुरक्षा वाढवली

Abhijeet Shinde

सौदीकडून 80 टन ऑक्सिजन येणार

Patil_p

धक्कादायक! तीन दिवसाच्या बाळासह मातेला कोरोनाची लागण 

prashant_c
error: Content is protected !!