तरुण भारत

कोरोनाचे चार संशयित विलगीकरण कक्षात

राज्यात कोरोना नियंत्रणात / पणजी प्रतिनिधी

कोरोनाचे संशयास्पद रुग्ण असलेल्या चार जणांना रविवारी गोमेकॉच्या विलगीकरण विभागात ठेवण्यात आले आहे, तर आणखी 63 जणांना घरात कोरोन्टाईन करण्यात आले आहे. संशयास्पद रुग्णांची संख्या तशी कमी असून होमकोरोन्टाईन केलेल्या रुग्णांचीही संख्या तशी कमीच आहे. सध्या राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. 23 मार्च रोजी शेवटचा कोरोनाबाधित रुग्ण राज्यात सापडला होता. एकूण 7 कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. त्यापैकी पाच रुग्ण निगेटिव्ह ठरले आहेत. त्या पाचही जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आता केवळ दोन रुग्ण गोमेकॉत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.   

Advertisements

सातपैकी सहा रुग्ण हे विदेश प्रवास करून आले होते. तर एक रुग्ण हा नातेवाईक असल्याने एका रुग्णाच्या संपर्कात आला होता. कोरोनाची स्थिती राज्यात नियंत्रणात असून सरकारने हे उर्वरित दोन रुग्ण बरे होतील, असा दावा केला आहे.

Related Stories

काँग्रेसच्या स्थिर सरकारासाठी मडगावकरांची भूमिका निर्णायक

Amit Kulkarni

कुंकळ्ळीत ‘स्टेप-अप इस्पितळ’ स्थापण्याची तयारी

Patil_p

जगातील पहिल्या ‘सायंटून’ पुस्तकात चौगुले कॉलेजचे योगदान

Patil_p

म्हापसा सबयार्डात जमावाकडून प्राणघातक हल्ला

Omkar B

गोव्यातील प्रवासी बस वाहतुकीच्या प्रश्नावर तोडग्यासाठी पुन्हा प्रयत्न होणार, बस मालक संघटनेने घेतली वाहतुकमंत्र्यांची भेट

Omkar B

कॉसिनो पुन्हा एकदा सुरू

Amit Kulkarni
error: Content is protected !!