तरुण भारत

कोरोना : राज्याच्या चिंतेत वाढ, नवे ८२ रुग्ण पॉझिटिव्ह

प्रतिनिधी/मुंबई

राज्यात कोरोनाचा विळखा काही केल्या कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढच होत आहे. यामुळे राज्याच्या चिंतेत आता वाढ झाली आहे. आत्तापर्यंत आणखी ८२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या २ हजार ६४ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत तर देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. ८२ कोरोना बाधितांपैकी ५९ रुग्ण मुंबईतले आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउनही ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला असला तरी नागरिकांकडून काळजी घेतली जात नसल्याने कोरोना बाधिताच्या संख्येत वाढच होत आहे. महाराष्ट्रात रेड,ऑरेंज आणि ग्रीन झोनही आखण्यात आले आले आहेत.

Advertisements

Related Stories

देशात 36,604 बाधित, 501 मृत्यू

datta jadhav

शस्त्रक्रियेनंतर शरद पवारांचा फोटो शेअर करत सुप्रिया सुळे म्हणाल्या…

triratna

पुणे विभागातील 41,541 रुग्ण कोरोनामुक्त !

Rohan_P

सायना नेहवालने केला भाजपमध्ये प्रवेश

prashant_c

”सर्वाधिक लसी महाराष्ट्राला दिल्या, तरीही लसींचा पुरवठा होत नाही अशी राज्य सरकारची तक्रार”

triratna

झिंगझींग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल, तर मग हे शुद्धीत कसे असणार? ; नितेश राणेंचा सवाल

triratna
error: Content is protected !!