तरुण भारत

विटा नगरपालिकेत गरजूंसाठी मदत केंद्र सुरू : अ‍ॅड. वैभव पाटील

प्रतिनिधी / विटा
शहरातील हातावर पोट असणाऱ्या आणि ज्यांना कोणताच आधार नाही अशा गरजूंच्या सहाय्यासाठी विटा नगरपालिकेत मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. दानशूर व्यक्ती, सहकारी, सेवाभावी संस्था, क्रिडा मंडळे, गणपती तथा नवरात्र मंडळांनी अन्नधान्य, किराणा साहित्य जमा करावे असे आवाहन करीत जमा झालेले साहित्य गरजुपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासन पार पाडेल, अशी माहिती माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव पाटील यांनी केले.

याबाबत माजी नगराध्यक्ष पाटील म्हणाले, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शहरातील क्रीडा मंडळे, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, व्यापारी संघटना, इंजिनिअर्स असोसिएशन, सराफ असोसिएशन, किराणा व्यापारी असोसिएशन, भाजीपाला व्यापारी असोसिएशन यांना आपण मदतीचे आवाहन केले होते. शहरातील रेशनधान्य दुकानदारांना प्रशासनाने धान्य उपलब्ध करून दिले आहे. काही रेशनकार्डधारक वर्षानुवर्षे रेशनकार्डवरील धान्य नेत नाहीत. अशा कार्डधारकांचे धान्य शिल्लक असते. ते धान्य प्रशासनाने गरजूंच्या सहाय्यासाठी विटा नगरपालिकेने स्थापन केलेल्या मदत केंद्राला उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अ‍ॅड. पाटील यांनी केली. कोरोना प्रतिबंधासाठी सध्या लागु असलेला लॅाकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. या पार्श्वभुमीवर आपणा सर्वांचीच जबाबदारी आणखी वाढताना दिसत आहे. आजपर्यंत आपण सर्व विटेकरांनी मोठ्या संयमाने परिस्थितीला सामोरे जात आपल्या परिसरांत कोरोना संक्रमण होणार नाही यासाठी कसोशीचे प्रयत्न केले आहेत. दुसऱ्या बाजुला सामाजिक संघटनानी आपल्या परिसरातील गरजु, गरीब आणि हातावर पोट असलेले आपले बांधव उपाशी राहणार नाही, यासाठी योगदान दिले आहे.

Advertisements

येणाऱ्या काळात आपणा सर्वांना या दोन्ही पातळीवर लढायचे आहे. सर्व विटेकरांनी संयमाने परिस्थितीला सामोरे जात घरीच थांबुन सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करायचेच आहे. त्याबरोबरच आपल्या परिसरातील गरजु, गोरगरीब उपाशी झोपणार नाही, यासाठी आता सर्वांनीच यथाशक्ती योगदान द्यायची वेळ आली आहे. विटा नगरपालिका या संकटाच्या परिस्थितीमध्ये कमी पडणार नाही. आरोग्याचे प्रश्न, पाणीपुरवठा, दिवाबत्ती ही मूलभूत सुविधा देण्याचे काम करीलच, पण त्याही पुढे जाऊन जे शक्य आहे, ते सर्व नगरपालिकेच्या माध्यमातुन करता येईल. तरीही नगरपालिकेला पण मर्यादा आहेत. त्यामुळे आपल्या परिसरातील गरजुंच्या सहाय्यासाठी शहरातील विविध सहकारी संस्था, सेवाभावी संस्था, विविध क्रिडा मंडळे, गणपती तथा नवरात्र मंडळांनी पुढे यावे. शहरातील हातावर पोट असलेल्या आणि ज्यांना कोणताच आधार नाही, ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांच्यासाठी योगदान देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

या सर्व कामाच्या सुसुत्रीकरणासाठी नगरपालिकेमध्ये स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. दानशूर व्यक्ती, संस्था यांनी त्याठिकाणी अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, किराणा साहित्य जमा करावे. त्याचे व्यवस्थित किटस् बनवुन गरजुपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी पालिका प्रशासन पार पाडेल. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ही वेळ राजकारणाची नसुन कसोटीची आहे. त्यामुळेच सर्वांनीच या गंभीर परिस्थितीमध्ये जबाबदारीने वागूया. सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करुया व आपली, कुटुंबाची, समाजाची, शहराची आणि पर्यायाने देशाची सुरक्षितता जपुया, असे आवाहन माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव पाटील यांनी केले आहे.

Related Stories

कोल्हापूर बाजार समितीवर प्रशासक

Abhijeet Shinde

अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका ; याचिका फेटाळली

Abhijeet Shinde

कोरोना, महापुराचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे : आ. पी एन पाटील

Abhijeet Shinde

कोरोनात गुलाबी थंडीची चाहूल

Patil_p

राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज यांना मातृशोक

Abhijeet Shinde

सांगलीत 497 नवे रुग्ण तर 685 जण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!