तरुण भारत

दिल्ली परिसर पुन्हा भूकंप हादरला

रविवारी सायंकाळीही बसला होता धक्का

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली एनसीआर परिसरात लागोपाठ दुसऱया दिवशी सोमवारी दुपारी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर याची 2.7 इतकी नोंद झाली असून केंद्रबिंदू जमिनीखाली 5 किलोमीटर होता, असे दिल्लीतील भूकंप मापक केंद्राच्यावतीने सांगण्यात आले. रविवारी सायंकाळीच 3.5 रिश्टर स्केलचा धक्का जाणवला होता.

रविवारी सायंकाळी 5.45 च्या सुमारास धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. या भूकंपाचा केंदबिंदू पूर्व दिल्लीमध्ये होता. या भूकंपाने लॉकडाऊनमुळे घरात अडकून पडलेल्या नागरिकांची एकच धावपळ झाली. अनेकांनी बिल्डींगमधून बाहेर पडून मोकळय़ा मैदानाकडे धाव घेतली. सोमवारी दुपारीही पुन्हा 2.7 रिश्टर स्केलचा धक्का जाणवला. साधारण 17 मीटर उंचीच्या इमारतींमध्ये याची तिव्रता जाणवून आल्याचे राष्ट्रीय भूकंप केंद्राच्यावतीने सांगण्यात आले.

Related Stories

धुवास्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Patil_p

ओडिशामध्ये वायूगळती, 4 मजुरांनी गमावला जीव

Omkar B

मुंबई स्फोटांवर येतेय वेब सीरिज

Patil_p

बिहार : दिवसभरात 408 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

pradnya p

भारतात 75 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

४ फेब्रुवारीला ‘चौरी चौरा’ घटनेला १०० वर्षे पूर्ण

triratna
error: Content is protected !!