तरुण भारत

बोसने केली रोजंदारी कर्मचाऱयांची भेजनव्यवस्था

कोलकाता

 कोरोना महामारीच्या संकटाला संपूर्ण जगाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येमुळे अर्थव्यवस्थेवर भीषण संकट निर्माण झाले आहे. भारतालाही या महामारीची झळ पोहचली असून अनेक रोजंदारीवर असणाऱया कर्मचाऱयांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. केरळमधील कोरोनाग्रस्तांसाठी भारतीय संघातील फुटबॉलपटू सी.के. विनित मदतीसाठी झटत आहे. आता बंगालच्या सुभाषिश बोसने या महामारीमुळे बेघर आणि बेकार झालेल्या रोजंदारीवरील कर्मचाऱयांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था सुरू केली आहे.

Advertisements

दक्षिण कोलकात्यातील सुभाषग्राम येथे असलेल्या बोस याच्या निवासस्थानी या कामगारांसाठी मोफत भोजनाची सोय केली आहे. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आल्याने येथील स्थानिक रिक्षा चालकावर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्यासाठी बोसकडून प्रत्येक दिवशी मोफत धान्यवाटप चालू आहे. तांदूळ, डाळ, कडधान्य, बटाटे, कांदा या वस्तूंच्या पॅकेटस्चे वाटप केले जात आहे. कोरोनाच्या संकटातून संपूर्ण देश सुखरूप बाहेर पडेल, असा विश्वास बोसने व्यक्त केला.

संकटप्रसंगी गरजूंना मदत करण्यात मला मानसिक समाधान मिळत असल्याचे त्याने सांगितले. सुभाषिश बोस हा इंडियन सुपर लीग स्पर्धेत मुंबई सिटी एफसी संघाकडून खेळत आहे. कोरोना संकटामुळे ही स्पर्धा अर्धवट स्थितीत लांबणीवर टाकण्यात आली आहे.

Related Stories

टी-20 विश्वचषक स्पर्धेतून फर्ग्युसन बाहेर

Patil_p

सेहवाग म्हणाला, ‘त्या’ पंचांनाच द्या सामनावीर पुरस्कार

Patil_p

माजी ऑलिंपिक धावपटू बॉबी मॉरो कालवश

Patil_p

ऑलिंपिक हॉकीपटू विवेक सागरची पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती

Patil_p

तिरंदाज प्रशिक्षक सदस्याला कोरोनाची बाधा

Patil_p

मागील दोन वर्षात माझा प्रगल्भतेकडे प्रवास

Patil_p
error: Content is protected !!