तरुण भारत

सावजासह शिकारीही गतप्राण

ट्रान्सफॉर्मवर चिकटून माकड व बिबटयाचा मृत्यू

वार्ताहर /  देवरुख 

Advertisements

देवरुख नजीकच्या आंबव येथे माकडाचा पाठलाग करणाऱया बिबटय़ाला जीव गमावण्याची वेळ आली. विद्युत भारीत तारेला स्पर्श झाल्याने बिबटय़ाचा व माकडचाही दुर्दैवी अंत झाला. राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात सोमवारी ही घटना घडली. 

माकडाला भक्ष्य बनवण्यासाठी बिबटया त्याचा पाठलाग करत होता. बिबटय़ाच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी माकडाने विजेच्या ट्रान्सफार्मरवरच उडी मारली. मात्र, वीजेच्या धक्क्याने माकडाचा जागीच मृत्यू झाला. भक्ष्य आयतेच सापडल्याच्या आनंदात बिबटय़ानेही त्याचे लचके तोडण्यासाठी त्याच्यावर झडप घेतली. मात्र विजेचा जोरदार धक्का बसून त्याचाही मृत्यू झाला.

 या घटनेची खबर मिळताच विभागीय वनाधिकारी रमाकांत भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी प्रियांका लगड, वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक सागर गोसावी, एस. एस. गावडे, शर्वरी कदम घटनास्थळी दाखल झाले.  महावितरणच्या कर्मचाऱयांच्या सहाय्याने मृत बिबटय़ा व माकडाला ट्रान्सफार्मरवरुन खाली उतरवण्यात आले.

 संगमेश्वर तालुका पशुवैद्यकिय अधिकाऱयांनी मृत बिबटय़ा व माकड यांचे शवविच्छेदन केले. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भक्ष्याचा पाठलाग करताना माकड व बिबटय़ा या दोघांचाही अंत झाल्याने निसर्गप्रेमींकडून हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

कोरोनाबाधित महिलेकडून कर्मचाऱयांना धमकी

Patil_p

कोरोनाचे काम न करण्याचे मंत्र्यांनाही मान्य

Patil_p

आत्मविश्वासाने केली कोरोनावर मात!

NIKHIL_N

कशेडीत केवळ खेडवासीयांचेच स्वॅब

Patil_p

अखेर रत्नागिरीत रस्त्यांचे डांबरीकरण सुरू

Patil_p

माजी सैनिकांचे कॅन्टीन पूर्ववत सावंतवाडीत

NIKHIL_N
error: Content is protected !!