22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

रत्नागिरी : 6 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण

प्रतिनिधी/रत्नागिरी

रत्नागिरी साखरतर येथील 6 महिन्याच्या बाळाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधित महिलेच्या घरातील हे बाळ असून यामुळे रत्नागिरीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आता रत्नागिरीत कोरोना रुग्णांची संख्या 6 वर जाऊन पोहचली आहे.

रविवारी रात्री 42 जणांचे रिपोर्ट आले. यामध्ये एका सहा महिन्याच्या बाळाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. संबंधित बाळाच्या आजी पॉझिटिव्ह असून तिच्यावर यापूर्वीच उपचार सुरू आहे, त्यामुळे साखरतर येथील एकाच कुटुंबातील 3 रूग्ण आतापर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत. या कुटुंबातील 17 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. बाळावर सिव्हिल मध्ये उपचार सुरु असून घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.

Related Stories

निसर्ग चक्रीवादळ : मुंबईवरील धोका झाला कमी

datta jadhav

रिक्षाला धडकून दोघे दुचाकीस्वार ठार

NIKHIL_N

देवगडमधील इंटरनेट सेवा बारा तासाहून अधिककाळ ठप्प

NIKHIL_N

राम मंदिरावरून रोष, ISIS च्या दहशतवाद्याकडून मोठ्या कटाची माहिती उघड

Shankar_P

कोरोना औषधावर संशोधन करणारे 3 संशोधक झाले रातोरात करोडपती

datta jadhav

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदी विक्रांत जाधव

triratna
error: Content is protected !!