75 हजार रोजगार उपलब्ध होणार :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणुमुळे काही प्रमाणात विविध उद्योगधंदे आपले रोजगार सुरु ठेवण्यासाठी घरातून काम करण्याचा पर्याय देत आहेत. दुसऱया बाजुला विविध आर्थिक तरतूद निश्चित करुन व्यवसायात बळकटी आणण्याचे काम केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या ऍमेझॉनकडून हजारोंना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे समजते.
लॉकडाऊनच्या निर्णयामुळे बहुतांश लोक घरात बंदीस्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाऐवजी शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंसोबत अन्य सामानाची आवश्यकता भासते आणि ती मिळवण्यासाठी लोकांना आपल्या दाराची सीमा ओलांडून जाता येत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोक ऑनलाईन खरेदी विक्री करण्यावर भर देत आहेत. म्हणून ऑनलाईनमधील दिग्गज कंपनी ऍमेझॉन लवकरच 75 हजार कर्मचारी भरती करुन घेणार असल्याची माहिती आहे. विविध विभागांसाठी ही रोजगार निर्मिती असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
घरगुती साहित्यांची मागणी वाढली
लॉकडाऊनमध्ये आणखी दोन आठवडय़ांची वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी याबाबत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात घरांच्या शेजारी असणाऱया दुकानांमधील मालांचा तुटवडा होण्याचे संकेत असल्यामुळे लोक खाण्यापिण्याचे साहित्य तसेच आरोग्य आणि अन्य जीवनावश्यक गोष्टींची ऑनलाईन मागणी करण्याची शक्मयता दाट आहे. त्यासाठी ऍमेझॉनकडून हा निर्णय घेतला जाण्याची शक्मयता आहे.
तासावर वेतन
कोरोनाच्या वाढत्या संकटातही रोजगारांची निर्मिती करण्याचा विचार ऍमेझॉनने केला आहे. कारण लॉकडाऊनमुळे काही व्यवसाय प्रभावीत होण्याची भीती आहे. परंतु यातूनही सावरण्यासाठी विविध उपाय निर्माण केले जाणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. यासाठी कर्मचाऱयांसाठी वेतन तासावर देण्यात येणार आहे. यात 15 डॉलर प्रतितासाला देण्यात येणार असून कमीत कमी 2 डॉलरची वेतनात वाढ करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. वेतनात वाढ केल्यास कंपनी 50 कोटी डॉलरपेक्षा अधिकचा जादा खर्च करु शकेल असेही म्हटले जात आहे.