तरुण भारत

सर्व राष्ट्रीय हॉकी स्पर्धा बेमुदत लांबणीवर

हॉकी इंडियाचा निर्णय, परिस्थिती पाहून नव्या तारखा जाहीर करणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

हॉकी इंडियाने कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे काही स्पर्धा हॉकी स्पर्धांचे वेळापत्रक बदलले होते. पण आता लॉकडाऊन वाढविल्यामुळे 3 मेपर्यंत नियोजित असलेल्या सर्व राष्ट्रीय हॉकी स्पर्धा बेमुदत लांबणीवर टाकण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला.

राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप्स 29 एप्रिलपासून सुरू करून 3 जुलैपर्यंत त्या घेण्याचे आधी ठरविण्यात आले होते. पण आता या स्पर्धा तहकूब करण्याचा निर्णय हॉकी इंडियाने घेतला आहे. ‘हॉकी इंडियाच्या उर्वरित राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा आता लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडू, खेळाशी संबंधित असलेले घटक, प्रशिक्षक, आयोजक, चाहते, पदाधिकारी यांच्या सुरक्षिततेचा, आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेतलेला आहे,’ असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी स्पष्ट केले. ‘या स्पर्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्या असून कोरोना महामारी निर्मूलनाची स्थिती पाहून त्याच्या पुढील तारखा जाहीर करण्यात येतील,’ असेही ते म्हणाले.

जनतेचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी योग्य ती सर्व दक्षता घेण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित खात्यांशी सतत संपर्कात राहून हॉकी इंडिया कार्य करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. या स्पर्धांत सहभागी होणाऱया सदस्य संघटनांनी या कालावधीत ताजी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी या कालावधीचा उपयोग करण्याची सूचनाही त्यांनी केली.

 ‘स्पर्धा लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाला देशातील विविध यजमान व इतर सदस्य संघटनांनी पूर्ण सहकार्य करून मान्यता दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. सर्व संघटनांनी आपापल्या पोर्टलवर ताजी माहिती उपलब्ध करून खेळाडूंच्या नोंदणीची माहितीही द्यावी,’ अशी सूचनाही त्यांनी केली.

Related Stories

पंजाबविरुद्ध आज चेन्नई सुपरकिंग्जला विजयाची गरज

Patil_p

आरसीबी-चेन्नई सुपरकिंग्स ‘हाय व्होल्टेज’ लढत आज

Patil_p

‘स्लो स्टार्टर्स’ मुंबई आज केकेआरविरुद्ध लढणार

Patil_p

डायमंड लिग सिरीजमध्ये 14 स्पर्धांची शक्यता

Patil_p

बेंगळूर एफसीचा प्लेऑफ सामना 11 मे रोजी

Patil_p

विराट कोहलीला शेवटच्या तीन कसोटी हुकणार

Patil_p
error: Content is protected !!