तरुण भारत

फुटबॉलपटू फेलानीची रूग्णालयातून सुटका

शांघाय

 मँचेस्टर युनायटेड क्लबचा माजी फुटबॉलपटू मेरोनी फेलानी यांची मंगळवारी रूग्णालयातून सुटका करण्यात आली. चीनमधील सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत बेल्जियमचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू फेलानी सहभागी झाला होता. 22 मार्च रोजी त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याला 14 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. चीनच्या रूग्णालयात सुमारे तीन आठवडे  फेलानीवर वैद्यकीय इलाज चालू होता. फेलानी कोरोनामुक्त झाल्याने त्याला रूग्णालयातून घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली.

Advertisements

Related Stories

रोहित म्हणाला, वणक्कम चेन्नई!

Amit Kulkarni

रशियाचा फुटबॉलपटू कोरोनाबाधित

Patil_p

उमर अकमलवर तीन वर्षांची बंदी

Patil_p

प्रसंगी ब्रॉड किंवा अँडरसनलाही वगळले जाईल

Patil_p

सोनम, दीपक, रवि , जितेंदर यांची माघार

Patil_p

कॅलीस, झहीर अब्बास, स्थळेकर यांचा आयसीसी हॉल फेममध्ये समावेश

Patil_p
error: Content is protected !!