तरुण भारत

क्रिकेटपटू झफर सर्फराजचा कोरोनामुळे मृत्यू

पेशावर  :

पाकिस्तानचे माजी प्रथमश्रेणी क्रिकेटपटू झफर सर्फराज यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. पेशावरमधील एका खासगी इस्पितळात मागील तीन दिवसांपासून ते अतिदक्षता विभागात दाखल होते. मृत्यूसमयी ते 50 वर्षांचे होते. पाकिस्तानमधील प्रथमश्रेणी क्रिकेट वर्तुळातील एखाद्या खेळाडूचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. 1988 मध्ये पदार्पण करणाऱया सर्फराज यांनी पेशावरतर्फे खेळलेल्या 15 सामन्यात 616 धावांचे योगदान दिले. याशिवाय, 1994 मध्ये निवृत्त होण्यापूर्वी 6 वनडे सामने खेळत त्यात 96 धावा जमवल्या. पुढे 2000 च्या दशकात त्यांनी काही संघांना प्रशिक्षणही दिले होते.

Advertisements

Related Stories

एथर एनर्जी ई-स्कूटरची विक्री सुरू

Patil_p

जर्मनीचा व्हेरेव्ह अजिंक्य

Patil_p

बीसीसीआयचा अमिरात मंडळाला लेखी प्रस्ताव

Patil_p

बेलारूसची साबालेन्का मानांकनात चौथ्या स्थानी

Patil_p

रॉस टेलरची निवृत्तीची घोषणा

Amit Kulkarni

विश्वनाथन आनंद सलग चौथ्यांदा पराभूत

Patil_p
error: Content is protected !!