तरुण भारत

वास्तव्य अमेरिकेत पण लक्ष भारताकडेच…!

न्यूयॉर्कमध्ये कोरोनाविरोधी लढाई अधिक तीव्र रत्नागिरीची मानसी केळकर सांगतेय अनुभव

तन्मय दाते / रत्नागिरी

Advertisements

कोरोनाशी लढतना भारताने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकेतील सर्वच भारतीयांचे अर्धे लक्ष आपल्या मायभूमीकडेच लागलेले असते. भारतात असताना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपानचे कौतुक ऐकायची सवय लागलेली असते. पण अमेरिकेत कोरोनाचे थैमान सुरु असतानाही भारताचे कौतुक ऐकायला मिळण्याचे भाग्यही लाभत आहे. योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय यामुळे भारताने आत्तापर्यंत कोरोनावर कमालीचे नियंत्रण मिळवले आहे. अर्थात हा लढा आणखी काही काळ सुरूच राहणार आहे. पुढच्या लढय़ातही भारत असाच भक्कमपणे आणि नियोजनबध्द प्रतिकार करेल, असा विश्वास निर्माण झाला आहे.

   मूळ रत्नागिरीतील मानसी केळकर-मालपेकर 2014 मध्ये कॉम्प्युटर इंजिनियरिंगमध्ये एमएस करण्यासाठी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झाली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सध्या ती तेथेच फायनान्स कंपनीमध्ये तांत्रिक विभागात काम करते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमधील परिस्थिती, त्यांचा लढा आणि भारताविषयीची मते याबद्दल ‘तरुण भारत’शी बोलताना तिने अमेरिकेतील सद्यस्थिती सांगतानाच भारताबाबत अमेरिकास्थित भारतीयांच्या भावनाही मोकळेपणाने व्यक्त केल्या.

जीवनातील विरोधाभासाचे दर्शन

            जगभरात कोरोनाचा प्रचंड थैमान चालू असताना सर्वात जास्त पॉझिटिव्ह केसेस अमेरिकेत आहेत. त्यातही न्यूयॉर्कमध्ये हा आकडा सर्वोच्च आहे. येथे सर्व शाळा, ऑफिसेस, दुकाने बंद आहेत. बहुतांश देशात जसा लॉक-डाऊन आहे तसाच तो येथेही आहे. केवळ जीवनावश्यक सेवा सुविधा चालू ठेवण्यात आल्या आहेत. स्टे ऍट होम, वर्क फ्रॉम होम या नेहमी हव्याहव्याशा वाटणाऱया गोष्टीचाच आता जाच व्हायला लागलेला आहे. प्रचंड गर्दीचा नेहमी त्रास व्हायचा आता मात्र जमावबंदीचा कंटाळा यायला लागलाय. जगण्याच्या वाटेवरचे विरोधाभास प्रकर्षाने जाणवायला लागलेत एवढं मात्र खरं…..!

अमेरिकेत गर्दीची ठिकाणे ओस

            न्यूयॉर्क हे एक जगप्रसिध्द शहर असून व्यवसाय, पर्यटनादी निमित्ताने जगभरातून अनेक लोक येथे सातत्याने येत असतात. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रभाव येथे  अधिक प्रमाणात असणे अपेक्षित आहे. हेच लक्षात घेत सरकारनेही न्यूयॉर्कवर लक्ष केंद्रित केले आहे. अधिकाधिक प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सुविधांचे सक्षमीकरणही केले जात आहे. येथे जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या दिसते म्हणजेच येथे जास्तीत जास्त चाचण्या घेऊन कोरोनाग्रस्तांचा शोध घेतला जातोय.  विशेष म्हणजे सामान्य नागरिकही विविध ठिकाणी सहजरित्या आपली टेस्ट करून घेऊ शकतो. आवश्यक तेथे आर्थिक मदतीचा हातही अमेरिकेचे सरकार देऊ पहात आहे. न्यूयॉर्कसह सर्वच शहरामध्ये आज अनेक गर्दीची ठिकाणे ओस पडली आहेत. लोक सोशल डिस्टंन्सिग प्रामाणिकपणे पाळताना दिसतात. आमच्याप्रमाणे अनेक लोक घरातूनच काम करत आहेत. या महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक आणि योग्य ईलाज अवलंबण्याचा प्रयत्न शासन, नागरिक अशा दोन्ही पातळ्यांवर दिसतो आहे.

आटोक्यातील स्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका

       जगभरात ही महामारी पसरत असताना भारतही त्याला अपवाद नाही योग्यवेळी लॉकडाऊन जमावबंदी, संचारबंदी लागू केल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न उत्तमरित्या करण्यात आले आहेत. येथील परिस्थीतीचा अनुभव घेता भारतातील लोकांनी सुजाण नागरिक म्हणून नियंमाचे पालन आणि योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. कुठल्याही अफवांना बळी न पडता सरकारला सहकार्य करुन या महामारीचा सामना करायला हवा. देशात एक प्रकारची युद्ध परिस्थितीच उद्भवली आहे. वैदयकीय सुविधांवर ताण निर्माण झाला आहे. अशावेळी सध्या आटोक्यात असलेल्या परिस्थिताला हाताबाहेर जाऊ  न देणे हे केवळ सुजाण भारतीय नागरिकाच्या हातात आहे.

Related Stories

जिह्यात 518नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Patil_p

100 टन धान्य वाटपातून दान उत्सव

NIKHIL_N

तांबळडेगच्या नुकसानीबाबत तहसीलदारांना निवेदन

NIKHIL_N

रत्नागिरी : पन्हळे धरणाला पडतायत भेगा, लवकर काम सुरु करण्याची ग्रामस्थांची मागणी

Abhijeet Shinde

बांदा सोसायटी हॉल बांधकामसाठी ५ लाखाची देणगी

NIKHIL_N

सागरी सुरक्षा कवच मोहिमेची रेड टीम देवगडात ताब्यात

NIKHIL_N
error: Content is protected !!