तरुण भारत

24 तास पाणी पुरवठय़ासाठी अखेर कंत्राटदार निश्चित

प्रतिनिधी/ बेळगाव

चोवीसतास पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करण्यासाठी कंत्राटदार मिळत नसल्याने योजनेचे काम रखडले होते. अखेर योजनेचे काम करण्यासाठी प्रशासनाला कंत्राटदार मिळाला असून सदर काम एल ऍण्ड टी कंपनीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील 48 वॉर्डमध्ये 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरच मार्गी लागणार आहे.

Advertisements

चोवीसतास पाणी पुरवठा करण्यासाठी 10 वॉर्डमध्ये प्रायोगिक तत्वावर योजना राबविण्यात आली होती. ही योजना यशस्वी झाल्यामुळे उर्वरित 48 वॉर्डमध्ये योजनेचा विस्तार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. याकरिता 435 कोटी निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार आतापर्यंत तीनवेळा निविदा काढून ही योजना संपूर्ण शहरात राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. मात्र कंत्राटदार मिळत नसल्याने पाणीपुरवठा योजना राबविण्याचे काम रखडले होते. मात्र या दरम्यान पाणी पुरवठा मंडळाने शहराच्या विविध भागात सात जलकुंभ आणि बसवणकोळ्ळ येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाची उपारणी केली आहे. 48 वॉर्डमध्ये योजनेचा विस्तार करण्यासाठी 22 जलकुंभांची उभारणी आणि सर्व वॉर्डमध्ये जलवाहिन्या घालण्याची गरज आहे. सदर काम करण्यासाठी जागतीक बँकेकडून कर्ज घेऊन योजना राबविण्यात येणार आहे. सदर काम एल ऍण्ड टी कंपनीला देण्याचा निर्णय पायाभूत सुविधा खात्याने घेतला आहे. त्यामुळे ही योजना राबविण्यासाठी कंत्राटदार मिळाला असून संपूर्ण शहरात 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लागण्याची शक्मयता आहे.

Related Stories

विघ्नहर्त्याचे आज आगमन

Patil_p

ई-कचऱयाचे व्यवस्थापन प्रत्येकाची जबाबदारी

Amit Kulkarni

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

Patil_p

रुग्णवाहिका पेटविल्याप्रकरणी तरुणाला अटक

Amit Kulkarni

गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

Rohan_P

उपमुख्यमंत्र्यांची सरकारी पॉलिटेक्निकला भेट

Patil_p
error: Content is protected !!