तरुण भारत

मद्यविक्री दुकानात चोरीचे प्रकार वाढले

प्रतिनिधी/ बेळगाव

लॉकडाउनच्या कालावधीत मद्यविक्री बंद झाल्याने मद्यपींची प्रचंड गैरसोय झाली आहे. यामुळे आता मद्यविक्री दुकानातून चोरीचे प्रकार वाढले आहेत. सोमवारी मध्यरात्री गोकाक तालुक्यातील गणेशवाडी गावातील एमएसआयएल दुकानात चोरी झाली आहे. तर काँग्रेस रोड टिळकवाडी येथील मद्यविक्री दुकानात चोरीचा प्रयत्न झाला आहे. गणेशवाडी येथील दुकानात सोमवारी मध्यरात्री चोरटय़ांनी दुकानातून दारूचे 50 बॉक्स घेऊन पलायन केले आहे. तर काँग्रेस रोड टिळकवाडी येथील वाईन्स ऍन्ड वाईन्स या दुकानातही चोरीचा प्रयत्न झाला आहे. याबाबत अनुक्रमे घटप्रभा आणि टिळकवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

Advertisements

गणेशवाडी गावातील मल्लिकार्जुन चौकशी यांच्या पेट्रोल पंपाजवळ असणाऱया एमएसआयएल दारू विक्री दुकानात सोमवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. चोरटय़ांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला होता. तसेच दुकानातून दारूचे 50 बॉक्स घेऊन पलायन केले आहे. घटप्रभा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी श्वानपथकाद्वारे तपासणी सुरू केली आहे.

काँग्रेस रोड येथील वाईन्स ऍन्ड वाईन्स या दुकानात सोमवारी मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाला आहे. मात्र हा प्रयत्न विफल झाला आहे. मध्यरात्री चोरटय़ांनी दुकानाच्या वरील भागातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी झाला आहे. याबाबत दुकान मालकांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सरकारने मद्यविक्रीवर निर्बंध घातले आहेत. यामुळे मद्यपींची पंचाईत झाली आहे. काहीही झाले तरी आम्हाला दारू द्या अशी मागणीही मद्यपींकडून होत आहे. तर याचाच गैर फायदा घेत काहीनी जादा दराने आणि चोरटय़ा मार्गाने दारू विक्री चालू केली आहे. यामुळे सध्या दारूला भरपूर मागणी वाढली आहे. यातूनच मद्यविक्रीची दुकाने फोडून दारू लांबविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

बॉक्स

मद्यविक्री 20 एप्रिलपर्यंत राहणार बंद

लॉकडाऊनमुळे राज्यातील मद्यविक्रीवर दि. 14 एप्रिलपर्यंत निर्बंध घालण्यात आले होते. मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आल्याने मद्यविक्रीवरील निर्बंधही वाढविण्यात आले आहेत. आता 20 एप्रिलपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय अबकारी खात्याने घेतला आहे. तसेच परिस्थिती पाहून मद्यविक्री सुरू करावी का याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

Related Stories

आरटीपीसीआरची सक्ती नागरिकांसाठी तापदायक

Patil_p

आरपीडी महाविद्यालयाला ए मानांकन

Amit Kulkarni

थकीत बिले न दिल्यास गेटसमोर आंदोलन

Omkar B

सुहासिनी महिला मंडळाचा मेळावा

Amit Kulkarni

सिव्हिल हॉस्पिटलमधील 30 व्हेंटिलेटर वापराविना?

Omkar B

औद्योगिक वसाहत सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी करा

Patil_p
error: Content is protected !!