तरुण भारत

जिल्हय़ात 371 जणांचा अहवाल निगेटिव्ह

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनाची धास्ती दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्यामुळे बेळगाव जिल्हय़ावर धास्तीची छाया अधिक गडद होत आहे. दि. 14 रोजी उपलब्ध झालेल्या अहवालानुसार जिल्हय़ात आतापर्यंत 1785 संशयितांची तपासणी झाली आहे. यामध्ये 371 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Advertisements

आरोग्य खात्याच्या जिल्हा समीक्षा विभागाने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार जिल्हय़ातील विलगीकरण केलेल्या हॉस्पिटलमधील रुग्णांची संख्या 20 आहे. एकूण 14 दिवसांचे विलगीकरण पूर्ण केलेले रुग्ण 664 इतके असून 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्यांची संख्या 825 इतकी आहे. एकूण 484 जणांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये 371 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्हा आरोग्य खात्याकडून प्रसिद्ध केलेला दि. 14 रोजीचा अहवाल…

1) आतापर्यंत तपासणी झालेले रुग्ण- 1785

2) 14 दिवसांसाठीचे विलगीकृत सदस्य- 276

3) हॉस्पिटलमधील आयसोलेटेड रुग्ण- 20

4) 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेले संशयित- 664

5) 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेले संशयित- 825

6) तपासणीसाठी संकलित नमुने- 484

7) पॉझिटिव्ह रुग्ण संख्या- 18

8) निगेटिव्ह आलेली संख्या- 371

Related Stories

सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी आरटीओंकडून सूचना

Patil_p

हालग्याजवळ पडलेल्या ‘त्या’ निराधार व्यक्तीला तातडीची मदत

Patil_p

अलारवाड सांडपाणी प्रकल्पासंदर्भात मनपाचे प्रतिज्ञापत्र फेटाळले

Omkar B

ऑक्सिजनसाठी वृक्षारोपण महत्त्वाचे

Amit Kulkarni

बाळेकुंद्री खुर्द परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात

Amit Kulkarni

जांबोटी येथील फोटोग्राफर बेपत्ता

Patil_p
error: Content is protected !!