तरुण भारत

डॉ. आंबेडकर जयंतीचे आचरण साधेपणाने

प्रतिनिधी/ बेळगाव

लॉकडाऊनमुळे डॉ. आंबेडकर जयंतीचे आचरण साधेपणाने करण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि जयंती समितीच्यावतीने सदाशिवनगर येथील बुद्ध विहार आणि डॉ. आंबेडकर उद्यानात मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आमदार अनिल बेनके यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महापालिका आयुक्त जगदीश के. एच., सीआरसी श्रीकांत कट्टीमनी आदींच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करण्यात आले. डॉ. आंबेडकरांनी आम्हाला घटना दिली असून, आम्ही सर्व भारतीय आहोत, असा संदेश दिला आहे. आज त्यांच्या घटना आणि मार्गदर्शनानुसार आम्ही वाटचाल करत आहोत. यंदा कोरोनाच्या संकटामुळे साधेपणाने जयंतीचे आचरण करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 3 मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे. यामुळे सर्वांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केले. आमदार अनिल बेनके यांनीही विचार मांडले. लॉकडाऊनमुळे समितीच्यावतीने घराघरात जयंतीचे आचरण करण्याची सूचना केली होती. यंदाच्या जयंती उत्सवाचा खर्च गोरगरिबांवर करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले. याप्रसंगी दलित नेते मल्लेश चौगुले यांच्यासह विविध दलित संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  

Advertisements

Related Stories

एसपीएम रोडवर बेशिस्तपणे वाहनांचे पार्किंग

Amit Kulkarni

बागायत पिकांना विमा योजना

Amit Kulkarni

उचगाव प्राथमिक मराठी शाळेत स्मार्टरुमचे उद्घाटन

Amit Kulkarni

व्ही. के. सनमुरी यांचे कार्य कौतुकास्पद

Omkar B

रोटरी क्लबतर्फे स्वच्छता जागृती कार्यक्रम

Amit Kulkarni

विनामास्क फिरणाऱयांवर कारवाईस प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!