तरुण भारत

बटाटा-कांदा उत्पादक शेतकऱयांमध्ये संभ्रम

बेळगाव / प्रतिनिधी

 कोरोनामुळे एपीएमसी मार्केटमध्ये सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. भीती आणि तणाव यामध्ये जनता वावरत आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकऱयांसाठी बाजारपेठा खुल्या ठेवल्या आहेत. तरी शेतकऱयांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. एपीएमसी मार्केटमधील काही दुकानांमध्ये बटाटा, कांदा, गुळ व रताळी खरेदी-विक्री सुरू आहे. असे असले तरी शेतकऱयांना एपीएमसी मार्केट सुरू आहे की नाही हेच माहिती नाही. त्यामुळे शेतकऱयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. याबाबत एपीएमसी अध्यक्षांशी सपर्क साधला असता मार्केट सुरू असून शेतकऱयांनी माल मार्केटला आणावा, असे आवाहन केले आहे.

Advertisements

  काही शेतकऱयांना मार्केट सुरू आहे, हे माहीत असले तरी त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. कारण ठिकठिकाणी पोलिसांनी रस्ते बंद केले आहेत. याबरोबरच शेतकऱयांनाही बऱयाच वेळा मारहाण होत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच मध्यंतरी पावसाचा शिडकावा झाला आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या मालाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

  सध्या उन्हाळी बटाटय़ाची काढणी शेतकऱयांनी केली आहे. त्यांना ते बटाटे विक्री करण्यासाठी धडपड करावी लागत आहे. मात्र एपीएमसीमधील अनेक दुकाने बंद असल्यामुळे काही शेतकऱयांना बटाटा व कांदे कोठे विक्री करावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक शेतकऱयांचा क्यापारी ठरलेला असतो. त्याच दुकानात  तो माल दिला जातो. मात्र सध्या परिस्थिती गंभीर झाली आहे. तरीदेखील दुसऱया व्यापाऱयांकडे शेती माल विक्री कसा करायचा, या संभ्रमात अनेक शेतकरी अडकले आहेत.

  दरम्यान, वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस रस्त्यावर बॅरिकेड्स लावून अडवणूक करत आहेत. सरकारने व जिल्हा प्रशासनाने शेतकऱयांना अडवू नये, असा आदेश दिला तरी प्रत्यक्षात मात्र त्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे  दिसून येत आहे. शेतकऱयांची अडवणूक जागोजागी होत आहे. त्यामुळे शेतकरी मार्केटला येण्यास धजत आहेत. शेतकऱयांचा भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहराच्या बाहेर तीन ठिकाणी तात्पुरती मार्केट सुरू करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी शेतकरी भाजीपाल्यासह बटाटा व कांदाही घेऊन येत आहेत. मात्र बटाटा व कांदा एपीएमसीकडे न्यावा, असे शेतकऱयांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना तेथून पुन्हा एपीएमसीकडे धाव घ्यावी लागत आहे. या प्रकारामुळे  शेतकऱयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शेतकऱयांनी बटाटा आणि कांदा असेल तर एपीएमसी मार्केटकडे घेऊन यावे. त्याचबरोबर सुरक्षित अंतर ठेवून आपला व्यवहार करावा, असे आवाहन एपीएमसीचे अध्यक्ष आनंद पाटील यांनी केले आहे..

Related Stories

पॅकबंद चटपटीत पदार्थांमध्ये आढळल्या अळय़ा

Amit Kulkarni

उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने पौष्टिक आहाराबाबत मार्गदर्शन

Patil_p

शंकरगौडा पाटील यांच्या वाढदिनी विविध उपक्रम

Omkar B

महामारी सांसर्गिक काळात योग आवश्यक

Patil_p

हुतात्मादिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन तालुका म. ए. समितीचे आवाहन

Amit Kulkarni

राजहंसगड येथील किराणा दुकानदार अपघातात ठार

Patil_p
error: Content is protected !!