तरुण भारत

नावेलीतील आसरास्थळावर राखीव दलाच्या जवानांचा पहारा

परप्रांतीय मजुरांच्या मोकाट वावराला आळा घालण्याच्या दृष्टीने उपाययोजना

प्रतिनिधी / मडगाव

Advertisements

नावेली येथील इनडोअर स्टेडियममध्ये बेघर परप्रांतियांना आसरा देण्यात आला असला, तरी हे कामगार वरचेवर बाहेर पडत असल्याने त्यातून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्मयता प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे तसेच बिगरसरकारी संस्थांकडून व्यक्त झाल्यानंतर आता त्या ठिकाणी राखीव पोलीस दलाच्या सशस्त्र जवानांचा पहारा ठेवण्यात आला आहे.

सोमवारी सायंकाळी आयजीपीनी या आसरास्थळाला भेट देऊन पाहणी केली व तेथे ठेवलेले मजूर बाहेर पडणार नाहीत याची काळजी घेण्याचे निदेश दिले. त्यामुळे मडगाव शहरातील पालिका चौकात या मजुरांची वर्दळ मंगळवारी दिसून आली नाही. मडगावच्या शहरी भागातील पालिका चौक परिसरात परप्रांतीय मजुरांची चालू असलेली वर्दळ हा चिंतेचा विषय बनला होता. त्यातील बहुतेक मजूर हे नावेलीतील आसरास्थळातील असल्याचा दावा होऊ लागला होता. या समस्येवर प्रकाशझोत टाकण्यात आल्यानंतर पोलिसांनी रविवारी मोहीम हाती घेताना या चौकात व नजीकच्या परिसरात फिरणाऱया मजुरांना हाकलून लावले होते.

या पार्श्वभूमीवर नावेली येथील इनडोअर स्टेडियममध्ये आसरा देण्यात आलेल्या बेघर परप्रांतीय मजुरांवर योग्य प्रकारे देखरेख ठेवली जात नसल्याबद्दल शॅडो कौन्सिल फॉर मडगाव व स्थानिक रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता आणि हे मजूर सर्वत्र मोकळे फिरण्याबरोबर चक्क स्टेडियममध्ये दारू घेऊन जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. या मजुरांना दारूच्या बाटल्या घेऊन आसरास्थळात जाताना स्थानिकांनी पकडल्याचा दावाही कुतिन्हो यांनी केला होता.

अधीक्षकांकडून चौकशीचे आदेश

मडगावातील व्यावसायिक विवेक नाईक यांनीही या मजुरांच्या खुल्या वावराविषयी आवाज उठवताना पालिका चौकात मजूर आल्यावर कारवाई करण्याऐवजी नावेलीतील आसरास्थळातून बाहेर पडण्यापासून त्यांना रोखून धरण्याच्या दृष्टीने सदर आसरास्थळावर पोलीस पथक नियुक्त करावे, असे सूचित केले होते. त्यानंतर तेथे वरीलप्रमाणे पहारा ठेवण्यात आला आहे. तसेच दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी मजूर आसरास्थळावर दारू घेऊन जात असल्याच्या दाव्यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Stories

बेशिस्त पार्किंग केल्यास कठोर कारवाई

Patil_p

खोल येथील ऑर्किड फुलशेती ‘कोरोना’मुळे कोमेजली

Omkar B

नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची : सरपंच

Omkar B

आयसीएआर अधिकारी मदिना सोलापुरी विरोधात गुन्हा नोंद

Amit Kulkarni

काँग्रेस कार्यकर्त्यांचा म्हापसा पाणी पुरवठा खात्यावर मोर्चा

Patil_p

पार्क केलेल्या रेल्वेत चोरीचा प्रयत्नः आरोपी अटकेत

Omkar B
error: Content is protected !!