तरुण भारत

वायदे बाजारात सोन्याचा नवा उच्चांक

ऑनलाईन टीम / मुंबई : 

कोरोनामुळे संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचे सावट असताना गुंतवणूकदारांचा मात्र, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वाढता कल आहे. आज वायदे बाजारात सोन्याच्या दराने उच्चांकी पातळी गाठली. एमसीएक्स एक्स्चेंजवर आज ट्रेडिंगवेळी 5 जून 2020 च्या सोन्याच्या वायदा दराने 46670 रुपये प्रति 10 ग्रॅमची उंची गाठत नवीन रेकॉर्ड बनविले आहे. 
 

Advertisements

तर 5 ऑगस्ट 2020 च्या वायदा दराने आज 0.85 टक्के म्हणजेच 396 रुपयांची वाढ नोंदविली आहे. हा दर 46,850 रुपये प्रति 10 ग्रामवर टेंड करत आहे. आतापर्यंत हा सोन्याचा सर्वात उच्चांकी दर आहे. वायदे बाजारात आज चांदीच्या दरातही 664 रुपयांची वाढ होऊन चांदी 44, 420 प्रति किलोवर पोहचली.

Related Stories

विमान वाहतुकीत घट

Patil_p

साखर उत्पादन 61 टक्क्यांनी वाढले

Patil_p

लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 3 हजार अब्ज डॉलर्सवर

Patil_p

बार्बेक्यु नेशनचा आज येणार आयपीओ

Patil_p

सॅमसंगला दुप्पट मोबाईल विक्रीचा विश्वास

Patil_p

टाटा पॉवरचा निव्वळ नफा दुप्पटीने वाढला

Patil_p
error: Content is protected !!