तरुण भारत

कोरोनामुळे BCCI कडून आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली

ऑनलाईन टीम / मुंबई :

दिवसेंदिवस देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली देशाची स्थिती लक्षात घेत अखेर बीसीसीआयने यावर्षी होणारी आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. हा निर्णय आज झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

Advertisements

यावर्षी  29 मार्च पासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा सर्वप्रथम 15 एप्रिल पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात तीन मे पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आले. त्यामुळे आता 29 मार्च ते 24 मे दरम्यान होणारी ही स्पर्धा आता एप्रिल-मे मध्ये देखील खेलवली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

मध्यंतरी बीसीसीआय सप्टेंबर मध्ये होणारा आशिया चषक पुढे ढकलून त्या जागी आयपीएल स्पर्धा घेणार होती. मात्र, पीसीबी अध्यक्षांनी यास नकार दिला. त्यामुळे आता बीसीसीआय कडे कोणता दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आता आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, यंदा ची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. 

Related Stories

भारतासाठी आज अस्तित्वाची लढत

Patil_p

ऑस्ट्रेलियनप्रमाणे विराटही सर्वाधिक परिपूर्ण खेळाडू

Patil_p

केर्बर, टोमलानोविक, फेलिक्स उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

भाजप आमदार मंदा म्हात्रेंचा पक्षाला घरचा आहेर, म्हणाल्या…

Abhijeet Shinde

दिल्लीत पिण्याचे पाणी, शौचालयाअभावी शेतकऱ्यांचे हाल

datta jadhav

सोलापुरात 40 नवे कोरोनाबाधित रुग्ण, रुग्णांची संख्या 1080 वर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!