तरुण भारत

शिराळा शहरासह तालुक्यात दोन ते अडीच तास मुसळधार पाऊस

शिराळा / वार्ताहर

शिराळा शहरासह तालुक्यातील अनेक गावात ढगांचा गडगडाट व वादळी वार्‍यासह वळीवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली. तब्बल दोन ते अडीच तास मुसळधार पाऊस पडत होता. शहरातील नाले ओसंडून वाहत होते.

Advertisements

यावेळी पावसामुळे शेतकरी वर्गाची मात्र एकच धांदल उडाली होती. अजुन काही शेतकऱ्यांची शेतामधील शाळु, गहू, खपली आदी पिके मळणीविना काढून शेतातच पडली आहेत. अचानक ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट होऊन मुसळधार पावसाची सुरवात झाली.

यामुळे शेतकरी वर्गाची पळापळी सुरू झाली होती. सोसाट्याचा वारा व ढगांचा आणि वीजेचा गडगडाटही मोठ्या प्रमाणात होत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके शेतातच भिजून गेली. तर जनावरांसाठी ठेवलेला कडबा, गवताच्या गंजी, पिंजार आदी चार्‍यांचे यावेळी भिजून अतिशय नुकसान झाले.

Related Stories

Belgoan Election: महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावला जाणार

Abhijeet Shinde

कोरोना काळात औषधांचा काळाबाजार निदर्शनास आल्यास कारवाई करणार

Abhijeet Shinde

कुंभोजात आजपासून तीन दिवसांचा लॉकडाऊनला सुरुवात

Abhijeet Shinde

कोल्हापूर : दारू दुकान समोर दोन गटात तुंबळ हाणामारी

Abhijeet Shinde

”काँग्रेसचे टूल किट खलिस्तान्यांच्या टूल किटपेक्षा खतरनाक”

Abhijeet Shinde

साखरपुडय़ाच्या कार्यक्रमातून 14 तोळे लंपास

Patil_p
error: Content is protected !!