तरुण भारत

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर बाजारात घसरण

सेन्सेक्स 310.21 अंकानी घसरला : निफ्टीतही घसरण

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ात शेअर बाजार मागील तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरु झाला आहे. यामध्ये शनिवार व रविवार असल्याने बाजार बंद होता. सोमवारी आठवडय़ातील पहिल्या दिवशी बाजार होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या जयंतीनिमित्त बाजाराला मंगळवारी सुट्टी होती. आज दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर शेअर बाजारातील सेन्सेक्स 310.21 अंकांनी घसरुन निर्देशांक 30,379.81 वर बंद झाला तर दुसऱया बाजुला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 68.55 अंकांनी घसरुन निर्देशांक 8,925.30 वर बंद झाला आहे.

कोविड 19 च्या वाढत्या प्रभावामुळे जगातील संकट वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम शेअर बाजारातील कामगिरीवर होत आहे. मंगळवारी जागतिक बाजारात घसरणीचा प्रभाव देशातील बाजारांवर झाला आहे. दिवसभरात एचडीएफसी बँक, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि कोटक बँक यांचे समभाग नुकसानीत गेले आहेत. 

बीएसई सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये कोटक बँकेचे समभाग बुधवारी मोठय़ा घसरणीत राहिले आहेत. सोबत हिरोमोटो कॉर्प, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यांचे समभाग प्रामुख्याने घसरले आहेत. सकाळच्या सत्राला सुरुवात होताना बाजारात सकारात्मक वातावरण होते. परंतु काही वेळानंतर चढउताराच्या वातावरणामुळे बाजाराने घसरणीला सुरुवात केली आहे.

अन्य बाबी

जागतिक बाजारातील नकारात्मक सूर आणि त्यामुळे आर्थिक विकासात घसरण होण्याच्या अंदाजामुळे बाजाराला नुकसान झाले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मंगळवारी 2020 साठी भारताचा विकास दर 1.9 टक्क्मयांनी कमी होणार असल्याचा अंदाज मांडला आहे. तसेच जानेवारीत हा दर 5.8 टक्के राहणार असल्याचे संकेत आयएमएफने दिले होते. त्यामुळे 1930 च्या महामारीपेक्षा कोरोनाचे संकट जास्त असणार आहे.

Related Stories

रोजगारनिर्मिती हवी; महागाई नको!

Patil_p

…काही मिनिटातच मिळणार मोटार इन्शुरन्स क्लेम

Patil_p

28 स्टार्टअप युनिकॉर्न क्लबमध्ये समाविष्ट

Amit Kulkarni

इन्फोसिस 4,335 कोटींनी नफ्यात

Patil_p

9 कंपन्यांचे भांडवल 2.93 लाख कोटींवर

Patil_p

सेबीची दोन कंपन्यांना आयपीओसाठी मंजुरी

Patil_p
error: Content is protected !!