तरुण भारत

खेडमध्ये गर्दी रोखण्यासाठी सरप्राईज नाकाबंदी

पोलिसांची पुन्हा धडक कारवाईची मोहीम, जप्त वाहने 3 मेपर्यंत ‘लॉक’

प्रतिनिधी/ खेड

Advertisements

अलसुरे येथील 50वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंसह अत्यावश्यक सेवांचीही दुकाने बंद होती. सोमवारपासून ही दुकाने उघडताच खरेदीसाठी झुंबड उडत आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी रोखण्यासाठी मंगळवारपासून येथील पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी पुन्हा एकदा कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. मुख्य रस्त्यांवर अचानक नाकाबंदी करत कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. जप्त होणारी वाहने 3 मेपर्यंत पोलीस स्थानकातच ‘लॉक’ राहणार आहेत.

   विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सक्त सूचनांकडे काही नागरिकांकडून त्याकडे कानाडोळा केला जात आहे. काही वाहनचालक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली रस्त्यावर फिरत होते.  पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी ही बाब देखील गांभिर्याने घेतली आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्याही क्षणी अचानक नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱयांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात येत आहे.

अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास येताच वाहने जप्त केली जात आहेत. बुधवारी महाडनाका येथे अनेकजण कारवाईच्या कचाटय़ात अडकले. पोलीस स्थानकासमोरही नाकाबंदी करून अनेक वाहने जप्त करण्यात आली. ही जप्त वाहने 3 मेपर्यंत पोलिसांच्या ताब्यातच राहणार आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडून देण्यात येणाऱया सूचनांचे काटेकोरपणे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी केले आहे.

Related Stories

दहिबावला क्रिकेट सामना पाहताना युवकाचा मृत्यू

NIKHIL_N

खाडीतील हल्ल्यात वाळू कामगार ठार

NIKHIL_N

जिह्यात कोरोनाचे आणखी 567 नवे रुग्ण

Patil_p

रत्नागिरी : लॉकडाऊन असतानाही दापोलीत पर्यटक

triratna

विद्युत डीपीतून ऑईल गळती होवून भात शेतीचे नुकसान

Patil_p

सुमारे पावणेतीनशे पर्ससीन नौका बंदरावर स्थिरावणार

triratna
error: Content is protected !!