तरुण भारत

एकीने लढूया कोरोनाला हरवूया

सातारा

कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता लॉक डाऊनचा कालावधी देखील दिनांक 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे या विषाणू शी लढताना महत्त्वाची सेवा बजावणारे हे वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आहे. कारण हे कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना विषाणू संदर्भातील रुग्णांची तपासणी करत आहेत. यामध्ये मुख्य भूमिका ही सरकारी हॉस्पिटलमध्ये सेवा बजावणाया कर्मचायांची आहे. कारण अधिकाधिक कोरोना तपासणी केंद्र किंवा कोरोना रुग्णांवर उपचार सरकारीच रुग्णालयात करण्यात येत आहे. इतर वेळी कित्येक नागरिक सरकारी रुग्णालयाकडे उपचार घेण्याकडे पाठ फिरवतात, पण आता मात्र कोरोना सारख्या महाभयंकर विषाणू शी लढताना ही सरकारी रुग्णालय व हेच येथे कार्य करणारे कर्मचारी त्यांच्या उपयोगी पडत आहेत. इतर वेळी त्यांच्या पैसे असणारे नागरिक ऑपरेशन किंवा इतर वैद्यकीय वैद्यकीय उपचारासाठी परदेशात रवाना होतात. पण आताच या सर्वांना मात्र आपल्या देशातील डॉक्टर व हॉस्पिटल आठवताहेत.

Advertisements

कोरोणा विषाणू संदर्भात तपासणी करणारे डॉक्टर व इतरत्र कर्मचारी हे आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता केवळ आपली सेवा म्हणूनच व आपले कर्तव्य म्हणूनच आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत आहेत.

तुम्ही घरी राहा

वैद्यकीय सेवा बजावणाया कर्मचायांच्यातफे? नागरिकांना एकच आवाहन करण्यात येत आहे, की सरकारी नियमांचे पालन करा व तुम्ही घरी राहा आणि कोरोना विषाणूला हरवा असा संदेश देण्यात येत आहे. कारण आपण जर या नियमांचे पालन केले तरच या विषाणूपासून आपल्या देशाला आपण वचवू शकतो. कारण अध्याप या विषाणू संदर्भात कोणतीच लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे याची सर्वांनी अधिक खबरदारी घेणे हे देखील तितकेच गरजेचे आहे.

केवळ देशाप्रती कर्तव्य हाच उद्देश

ज्याप्रमाणे सर्वांनाच कुटुंब आहे. त्याचप्रमाणे  कोरोना विषाणू संदर्भात वैद्यकीय सेवा बजावणाया डॉक्टर व कर्मचायांना देखील त्यांचे कुटुंब आहे. तरीदेखील ते आपले कर्तव्य म्हणून आपली सेवा बजावीत आहेत. कित्येकांनी तर आपल्या कुटुंबापासून विभक्त राहून या लढाईत स्वतःला झोकून दिले आहे. कारण ही लढाई जिंकता ना आपल्याला देखील याची बाधा होऊ शकते व ती आपल्या कुटुंबियांना किंवा मित्र वर्गीयांना होऊ नये यासाठी त्यांनी ही खबरदारी घेतली आहे.

Related Stories

23 जानेवारीपासून नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीसह होणार प्रजासत्ताक दिनाचा सोहळा

Sumit Tambekar

हुमणीचे एकात्मिक नियंत्रण अल्पखर्चिक आणि प्रभावी

Abhijeet Shinde

लॉकडाऊन संपुष्टात, मुरगावात मात्र वाढ

tarunbharat

कोव्हिशिल्ड लसीला ब्रिटनची मान्यता

Patil_p

पुलाची शिरोलीत सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्यांवर कारवाई

Abhijeet Shinde

मुसळधार पावसाने माणगंगा नदी दुथडी वाहू लागली

Abhijeet Shinde
error: Content is protected !!