तरुण भारत

बागलकोटमध्ये दोन, विजापूरमध्ये तिघांना लागण

वार्ताहर/ जमखंडी, विजापूर

जमखंडीतील पोलीस वसाहतीमधील एका पोलीस कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच बागलकोटमध्ये एका 52 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. 9 एप्रिल रोजी 4 वर्षीय बालकाला कोरोनाची बाधा झाली होती. त्याच्या संसर्गामुळे 52 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच बागलकोट जिल्हय़ात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14 झाली असून यापूर्वीच यातील एकाचा मृत्यू झाला होता. तसेच विजापूर जिल्हय़ात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. येथील कोरोनाबाधितांची संख्या 10 झाली आहे.

Advertisements

12 एप्रिल रोजी विजापुरातील एका महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. तिच्या संसर्गामुळे आणखी तिघांना कोरानाची लागण झाली आहे. 28 वर्षीय महिलेला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे, तर 28 वर्षीय महिला व 25 वर्षीय तरुणाला विजापूर जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

पत्नी मुलांनाही तपासणीसाठी पाठविले

जमखंडीतील सज्जी श्री हनुमान मंदिराजवळील पोलीस वसाहतीमध्ये राहणारा 39 वर्षाचा पोलीस सध्या मुधोळ पोलीस ठाण्यात सेवा बजावत होता. कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून स्वॅब बेंगळूरला पाठविण्यात आले असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला उपचाराकरिता बागलकोट येथील सरकारी दवाखान्यात आयसोलेशन वॉर्डामध्ये दाखल करण्यात आले. तसेच त्याची पत्नी व दोन मुलांची आरोग्य तपासणी करण्याकरिता बागलकोटला पाठविण्यात आले. तहसीलदार एस. बी. इंगळे, सीपीआय डी. के. पाटील, नगरपालिका आयुक्त रामकृष्ण सिद्दनकोळ्ळ यांनी या परिसराची पाहणी केली.

जमखंडीत कोरोनाचा रुग्ण आढळल्याची वार्ता पसरताच रस्ते ओस पडून स्तब्ध वातावरण निर्माण झाले. जनधन रक्कम काढण्याकरिता बँकांसमोर जमलेल्या नागरिकांची गर्दीही हटविण्यात आली. दुपारनंतर बँकाही बंद झाल्या तर अनेक रस्ते, गल्ल्या युवकांनी पुढाकार घेऊन प्रवेशबंदी करून आपला परिसर सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करण्यास प्रारंभ केल्याचे आढळून आले.

Related Stories

बनावट यादी बनवून पूरग्रस्तांची फसवणूक

Patil_p

सुवर्णसिंहासनासाठी कर्तव्यनिधी सुपूर्द

Amit Kulkarni

सीमाबांधवांचा कोल्हापुरात एल्गार !

Abhijeet Shinde

लॉकडाऊन काळात दारू विकणाऱया युवकाला अटक

Amit Kulkarni

ट्रकच्या धडकेत युवकाचा मृत्यू

Patil_p

विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा

Omkar B
error: Content is protected !!