तरुण भारत

तान्हुल्यासह बेळगाव विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

सूरतहून बेंगळूरला उपचारासाठी जाताना त्रास जाणवल्याने बेळगावमध्येच करावे लागले लँडिंग

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

बेळगावच्या सांबरा विमानतळावर मंगळवारी संध्याकाळी वैद्यकीय सेवा पुरविणाऱया विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. नवजात बालकासह माता वैद्यकीय उपचारासाठी सूरतहून बेंगळूरला विमानाने निघाली हेती. मात्र त्या तान्हुल्याला त्रास जाणवू लागल्याने सदर विमान बेळगाव विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानातून तान्हुल्यासह वैद्यकीय तज्ञांची एक टीम विमानतळावर दाखल झाली. लॉकडाऊनच्या काळातही इमर्जन्सी सेवा दिल्यामुळे बेळगाव विमानतळावरील अधिकारी व कर्मचारीवर्गाचे कौतुक केले जात आहे.

केंद्रीय विमानोड्डाण खात्याच्या नियमावलीनुसार 3 मेपर्यंत सर्व देशांतर्गत व देशाबाहेरील विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. परंतु इमर्जन्सीवेळी विमानतळ सेवा बजावत आहे. मंगळवारी बेळगावच्या विमानतळावर अशाच प्रकारे सूरत ते बेळगाव इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. डॉक्टरांनी पीपीई कीट घालून सूरत ते बेळगाव असा प्रवास केला. सध्या विमानतळ सकाळी 9 ते दुपारी 2 अशी सेवा देत आहे. परंतु इमर्जन्सी लँडिंग असल्यास कामाचा कालावधी वाढविला जात आहे.

बुधवारी सकाळी 10.30 वा. आलेले विमान बालक व मातेला बेळगावला सोडून मुंबईच्या दिशेने डॉक्टरांना घेऊन रवाना झाले. लॉकडाऊनच्या काळातही इमर्जन्सी लँडिंगसाठी नागरी उड्डाण विभागाच्यावतीने परवानगी दिली जात आहे. रुग्णांना तात्काळ सेवा देऊन त्यांचा जीव वाचविण्याचे काम विमानतळ प्रशासनाकडून केले जात आहे.  

इमर्जन्सी लँडिंगसाठी बेळगाव विमानतळ सज्ज

राजेशकुमार मौर्य (संचालक, बेळगाव विमानतळ)

कोणत्याही इमर्जन्सी लँडिंगसाठी बेळगाव विमानतळ सज्ज आहे. सध्या विमानतळावर 50 टक्के कर्मचारी कार्यरत आहेत. मेडिकलबरोबरच कार्गो सेवेसाठीही बेळगाव विमानतळ तयारीत आहे. मोठय़ा प्रमाणात कार्गो ट्रान्स्पोर्ट होणार असेल तर त्यालाही परवानगी दिली जात आहे.

Related Stories

कराटेपटू प्रिया जोमचा गौरव

Amit Kulkarni

बसस्थानकात आसनाअभावी प्रवाशांची गैरसोय

Patil_p

शनिवारचा दिवस मांसाहारासाठी

Patil_p

कोरोनाचा नायनाट कर, समृद्ध जीवनाची दिशा दे !

Patil_p

शनिवारी वकील-कुटुंबीयांना देण्यात आली लस

Patil_p

परिवहन मंडळाला टोल सवलत द्या

Patil_p
error: Content is protected !!