तरुण भारत

रविवारपेठ खुली पण गर्दीमुळे खावा लागला प्रसाद

नागरिकांनी एकाचवेळी गर्दी केल्यामुळे पोलिसांवर हुसकावून लावण्याची वेळ

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्मयातील किरकोळ व्यापारी व सर्वसाधारण नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रविवारपेठ येथील होलसेल दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु बुधवारी नागरिकांनी एकाचवेळी गर्दी केल्यामुळे ती आटोक्मयात आणण्यासाठी हुसकावून लावण्याची वेळ पोलिसांवर आली. काही जणांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. त्यामुळे होलसेल दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय जरी स्तुत्य असला तरी त्याची अंमलबजावणी करणे कठीण होत आहे.

रोजच्याप्रमाणे बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासूनच नागरिकांनी रविवारपेठ व परिसरात गर्दी केली होती. किरकोळ व्यापाऱयांपेक्षा नागरिकांचीच गर्दी यामध्ये जास्त होती. अन्नधान्य, भाजीपाला, साहित्य खरेदी केल जात होते. परंतु एकाच ठिकाणी गर्दी होत असल्याने अखेर पोलिसांनी नागरिकांना हुसकावून लावले. 10 नंतर कोणालाही बाजारपेठ परिसरात प्रवेश दिला जात नव्हता.

छोटे व्यापारी व नागरिकांची सोय व्हावी यासाठी व्यापारी व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांची एक बैठक पार पडली होती. त्यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत रविवारपेठ येथील होलसेल दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दररोज पहाटे 5 ते सकाळी 9.30 या वेळेत रविवारपेठ येथे गाडय़ा अनलोड केल्या जाव्यात, त्यानंतर 10 वाजेपर्यंत रिकाम्या गाडय़ा बाहेर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

किरकोळ व्यापाऱयांनी माल खरेदी केला तरच तो शहराच्या इतर भागापर्यंत पोहोचविता येणार आहे. परंतु सामान्य नागरिकही रविवारपेठेतील घाऊक दुकानांमध्ये गर्दी करत असल्यामुळे किरकोळ विपेत्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे या विपेत्यांनाही पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागत आहे.

बुधवारी गर्दी होताच पोलिसांनी नागरिकांना हुसकावण्यास सुरुवात केली. कोणीही विनाकारण गर्दी करू नये, अन्यथा वाहन जप्त केले जाईल, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत होते. परंतु गांभीर्य हरपलेल्या नागरिकांनी एकाच ठिकाणी गर्दी केल्यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. 

Related Stories

पेरू पिकातून एकरी 9 लाखांचे उत्पन्न

Patil_p

शहर परिसरात घुमला विठुनामाचा गजर

Amit Kulkarni

राज्यात कोरोना संख्या वाढत असताना आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची गरज : डॉक्टरांची मागणी

Abhijeet Shinde

कर्नाटकात बुधवारी तीन हजाराहून अधिक कोरोना बाधित

Abhijeet Shinde

खासगी शाळा बंद पाडण्याचा सरकारचा घाट का?

Amit Kulkarni

एअरमनची गोळय़ा झाडून घेऊन आत्महत्या

Patil_p
error: Content is protected !!