तरुण भारत

नव्व्यान्नव वर्षाच्या माजी लष्करी अधिकाऱ्याने जमवले 20 कोटी

ऑनलाईन टीम / लंडन : 

दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेल्या 99 वर्षांच्या माजी लष्करी अधिकाऱ्याने कोरोनाविरोधातील लढाईत सहभाग घेत वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 20 कोटी रुपयांचा निधी जमवला आहे. 

Advertisements

कॅप्टन टॉम मूर असे या माजी लष्करी अधिकाऱ्याचे नाव आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेला मदतीची गरज आहे. देशासाठी आपण काहीतरी केले पाहिजे या भावनेतून त्यांनी कोरोना लढाईत सहभागी असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी निधी जमवण्यास सुरुवात केली आहे.    

 वयाच्या 99 व्या वर्षी या माजी अधिकाऱ्यांची जिगर पाहून ब्रिटनमधील नागरिकांनी मदत करण्यात पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत त्यांनी 20 कोटी रुपयांचा निधी जमवला आहे. हा निधी ते डॉक्टर, नर्सेस व अन्य कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी करणार आहेत. कॅप्टन मूर हे येत्या 30 एप्रिल रोजी 100 वर्षांचे होणार आहेत. 

Related Stories

हायड्रॉक्सी क्लोरोक्विनला ‘संजीवनी बूटी’ची उपमा

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या दोन लाखांवर

datta jadhav

विद्यार्थ्यांना दिलासा : पदवी-पदव्युत्तरचे अंतिम वर्ष वगळता इतर वर्गाच्या परीक्षा रद्द : उदय सामंत

Rohan_P

किम जोंग उन यांची प्रकृती खालावली, शस्त्रक्रियेनंतर धोका वाढला

prashant_c

लॉकडाऊननंतर उद्योजकांसमोर आता नवीन संकट

datta jadhav

१० वी च्या प्रश्न पत्रिकेत महिलांविरोधात परिच्छेद

Sumit Tambekar
error: Content is protected !!