तरुण भारत

डिचोलीत लॉकडाउनचा फिरत्या विपेत्यांकडून फज्जा.

डिचोलीत लॉकडाउनचा फिरत्या विपेत्यांकडून फज्जा.

समाजिक सुरक्षा अंतर नाहीच. मनाला येईल तेथे थाटला जातो बाजार. शासकीय यंत्रणांचा कानाडोळा ?

Advertisements

डिचोली / प्रतिनिधी

   डिचोली शहरात सध्या कोरोना व्हायरसचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा विशेषतः फिरत्याविपेत्यांकडून फज्जा उडविला जात आहे. घरोघरी भाजी व फळे विक्री करण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयातून मिळविलेल्या पासचा दुरूपयोग करीत सध्या सदर विपेते बाजार परिसरात तसेच बसस्थानक परिसरात आपली दुकाने थाटत आहेत. त्यामुळे लोकांची सदर दुकानांवर झुंबड पडत असून कोणत्याही प्रकारे सामाजिक सुरक्षा अंतर राखण्याचा नियम पाळला जात नाही. याकडे सरकारी संबंधित यंत्रणा हेतुपुरस्सरपणे कानाडोळा करीत आहेत की काय ? असा सवाल आज डिचोलीवासीयांना पडला आहे.

   राज्यात 23 मार्च रोजी लॉकडाउन लागू करण्यात आल्यानंतर डिचोली पोलिसांनी निरीक्षक संजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण डिचोली तालुक्मयात लॉकडाउन यशस्वी केले होते. मात्र त्यानंतर किराणा मालाची दुकाने सरकारने सुरू केल्यानंतर बाजारात व शहरात लोकांची वर्दळ वाढली होती. ती वर्दळ अजूनही तशीच चालू असून सरकारनेच दुकाने चालू करण्याचा निर्णय घेतल्याने पोलिसही लोकांना अडवू शकत नाही. त्यातच आता तर डिचोली शहर परिसरात बिगरगोमंतकीय फळ, भाजी विपेत्यांनी कहरच केला आहे. वाहनांसाठी मिळविलेल्या पासचा सरळ सरळ दुरूपयोग करताना मनाला येईल त्याठिकाणी बाजार थाटत आहेत.

फिरत्या विपेत्यांना सरकारी यंत्रणेचा धाक राहिलेला नाही.

  सध्या डिचोली शहरात सुरू असलेला अनागोंदी प्रकार पाहता या फळ, भाजी विपेत्यांना सरकारी यंत्रणेचा, डिचोली नगरपालिकेचा धाकच राहिलेला नाही, असेच लक्षात येते. डिचोली नगरपालिका आपल्या कार्यक्षेत्रातील अशा बेकायदेशीर प्रकारांवर आळा घालण्यासाठी वावरत असतानाच हे फळ, भाजी विपेते पाहिजे त्या ठिकाणी वाहने उभी करून व्यवसाय करण्याचे धाडस करतात तरी कसे ? असा प्रश्न सध्या डिचोलीतील सुजाण नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे. यावरून सरकारी यंत्रणा व नगरपालिकेचा या फिरत्या फळ, भाजी विपेत्यांना धाकच राहिलेला नाही, असाच त्याचा अर्थ होतो, असेही लोक बोलू लागले आहेत.

पास व्यवस्थेचा सर्रासपणे दुरूपयोग

  लोकांनी घरातून बाहेर पडू नये व लोकांना घरपोच भाजी, फळे व इतर सामान उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने पास व्यवस्था चालीस लावली. भाजी तसेच किराणा माल या गोष्टी अत्यावश्यक असल्याने त्यांचा पुरवठा लोकांना घरबसल्या मिळावा यासाठी सदर पास व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी अनेकांनी आपल्या वाहनांचे क्रमांक देऊन अर्ज केल्यानंतर त्यांना पास मिळालेही. मात्र आज ज्या कारणासाठी पास मिळविले होते ते कारण बाजूलाच ठेऊन अक्षरशः पासचा दुरूपयोग केला जात आहे. सदर विपेते या पासचा लाभ उठवत आपली वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करून लोकांना त्याठिकाणी गर्दी करण्रास भाग पाडत आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही.

हे धाडस कोणाच्या आशिर्वादाने ?

 डिचोली बसस्थानकावर काल बुधवारी तर अक्षरशः भाजी, मासळी, फळ बाजारच भरला होता. बसस्थानकावर उंं®ा होर्डिंग असलेल्या कोपऱयात मासळी, भाजी, फळ विपेत्यांनी आपापल्या गाडय़ा पध्दतशीरपणे एका रांगेने पार्क करून आपला व्यवसाय चालू केला होता. डिचोली नगरपालिका अशा प्रकारे बाजार थाटू देत नाही. हल्लीच बंदरवाडा येथे भाजी विपेत्यांनी थाटलेला बाजार डिचोली नगरपालिकेने हटविला होता. अशी कारवाई होत असतानाही पालिकेला न जुमानता पुन्हा पुन्हा अशा प्रकारे बाजार थाटून लोकांना गर्दी करण्यास सदर वाहन पास असलेले विपेते भाग पाडत आहेत. या कृतीचे धाडस त्यांना कोणाच्या आशिर्वादाने प्राप्त होते, हा सध्या डिचोलीवासीयांना मोठा प्रश्न पडला आहे.

नगरपालिका व सरकारी यंत्रणांकडून कठोर कारवाईची लोकांना अपेक्षा.

  डिचोली बसस्थानक, बाजार परिसराबरोबरच सध्या शांतादुर्गा हायस्कुलसमोरील सर्कलजवळही सकाळी मोठय़ा संख्येने मासे विपेते आपापली वाहने उभी करून व सामाजिक सुरक्षा अंतर नियम धाब्यावर बसवून मासेविक्रीचा व्यवसाय करतात. त्याचप्रमाणे शहरातील अनेक ठिकाणी भाजी आणि फळ विपेते आपली वाहने उभी करून लोकांची गर्ली जमवत आहे. अशा विपेत्यांनी आपला माल घेऊन लोकवस्तीत फिरावे आणि व्यवसाय करावा. हे विपेते आज लोकवस्तीत न फिरता एका जागी बसून राहत असल्याने लोकांना घराबाहेर पडून बाजारात व शहरात फेरफटका मारावा लागत आहे. ज्यामुळे या कठोर लॉकडाउनचा सर्रासपणे फज्जा उडविला जात आहे. हे प्रकरण गंभीर असून त्याकडे नगरपालिका व शासकीय संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवून कारवाई करण्याची गरज आहे. एक दोनवेळा सांगूनही पुन्हा पुन्हा रस्त्यावर बसत असल्यास त्यंचा माल जप्त करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी डिचोलीतील लोकांकडून केली जात आहे.

Related Stories

गडकरी, गोयल यांना भेटले मुख्यमंत्री

Patil_p

पोर्ट टाऊन जेसीआयतर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तू प्रदान

Omkar B

कर्नाटकातील कोरोना उद्रेकाचा परिणाम मुरगाव बंदरावर

Patil_p

सांतीनेज नाला साफ करताना जेसीबी कोसळली

Omkar B

उच्च शिक्षण संचालनालयाचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर

Patil_p

पालिका निवडणुकीला तीन ‘अधिकमास’!

Amit Kulkarni
error: Content is protected !!