तरुण भारत

काळजी ‘क्वारंटाईन’ व्यक्तींची

 • रुग्णाच्या खोलीच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला हवी. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या आसपासची जागा नेहमी स्वच्छ असायला हवी. खोलीत थोडासुद्धा कचरा असता कामा नये.
 • रुग्णाची वॉशरूम, बेड आणि रुग्णाने हाताळलेल्या किंवा खोलीतील इतर वस्तू दररोज स्वच्छ कराव्यात. रुग्णाला घरातील अन्य कोणत्याही वस्तूला स्पर्श करू देऊ नये.
 • रुग्णाचा टॉवेल, भांडी, गॅजेट्स स्वतंत्र असावीत. इतरांच्या नित्याच्या वापराच्या वस्तू रुग्णाच्या संपर्कात येऊ देऊ नयेत. त्यामुळेच रुग्णाच्या सर्व नित्योपयोगी वस्तू वेगळ्या असणे आवश्यक आहे.
 • जर रुग्णाचा स्पर्श घरातील इतर वस्तूंना झाला, तर संपूर्ण घरात विषाणूंचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत घरातील इतर व्यक्तींनाही आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

स द्यस्थितीत ज्या व्यक्तींमध्ये करोनासदृश लक्षणे दिसून येतात, त्यांना थेट रुग्णालयात पाठविण्याऐवजी ‘होम क्वारंटाइन’ ठेवणे हा एक पर्याय असतो. 

 • सर्दी-पडसे किंवा खोकला-ताप या गोष्टी करोनाशी संबंधित असतीलच असे नाही. परंतु सध्याच्या विचित्र परिस्थितीत कोणतीही शक्यता नजरेआड न करता काळजी घेणेच इष्ट ठरते. घरातील एखाद्या व्यक्तीमध्ये अशी लक्षणे दिसून येताच काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
 • सर्वप्रथम आजारी व्यक्तीला घरात स्वतंत्र खोली देणे आवश्यक आहे. घरातील इतर खोल्यांपासून दूरची खोली देणे शक्य असल्यास ते अधिक चांगले. जर घरात ‘मास्टर बेडरूम’ असेल, म्हणजेच या बेडरूमलाच ऍटॅच बाथरूम असेल तर अधिक चांगले. अशी खोली रुग्णाला दिल्यास त्याचा इतरांशी संपर्क येण्याची शक्यता कमीत कमी राहील. रुग्णाला आवश्यक असणार्या सर्व वस्तू त्याच्या स्वतंत्र खोलीतच त्याला पुरवाव्यात.
 • या स्वतंत्र खोलीत घरातील इतर कोणालाही जाऊ देऊ नये. लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक असते. चुकूनसुद्धा लहान मुले रुग्णाच्या खोलीत जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
 • मुख्य म्हणजे, घरात पाळीव प्राणी असतील, तर त्यांनाही रुग्णाच्या संपर्कात येऊ देऊ नये.
 • रुग्णाची शुश्रूषा करणार्या किंवा त्याला हवे-नको पाहणार्या व्यक्तीनेही हाक मारताक्षणी रुग्णाच्या खोलीत धावत जाण्याची गरज नाही. अशा व्यक्तीने सर्वप्रथम आपले नाक आणि तोंड मास्कने किंवा रुमालाने झाकावे. रुग्णापासून एक मीटर अंतरावर राहूनच त्याच्याशी संवाद साधावा. स्वतःचा हात आपल्या नाकाला, तोंडाला किंवा डोळ्यांना लावू नये. खरे तर रुग्णाची देखभाल करण्यासाठी, त्याला हवे-नको पाहण्यासाठी घरातील एकाच व्यक्तीची निवड करणे चांगले. रुग्णाजवळ जाताना अशा व्यक्तीने हातात ग्लोव्हज घालावेत. रुग्णाला भेटून बाहेर आल्यावर हे ग्लोव्हज अशा ठिकाणी ठेवावेत, जिथे त्याला अन्य कुणी स्पर्श करणार नाही. रुग्णाला खोलीतून बाहेर आल्याबरोबर हात सॅनिटायझरने किंवा साबणाने स्वच्छ धुवावेत.
 • संशयास्पद किंवा अनुमानित रुग्ण ज्यांच्या घरात आहे, त्यांनी संसर्गासंबंधीची उपयुक्त माहिती नेहमी घेत राहायला हवे. त्यासाठी सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे.
 • हेल्थ केअर सेंटरशी संपर्क ठेवून रुग्णाच्या लक्षणांमध्ये झालेले छोटे-छोटे बदलही कळवत राहणे गरजेचे आहे. लक्षणांमधील बदलांबरोबरच रुग्णाचे वय विचारात घेणे अत्यंत आवश्यक असते.
 • कोविड-19 ची लागण झालेल्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तींना तसेच घरातील पाळीव प्राण्यांनाही सतत दूर ठेवणे हाच संसर्ग टाळण्याचा एकमेव उपाय असल्यामुळे रुग्णाविषयी अति भावनिक न होता कुटुंबीयांनी विवेकाने वर्तन करणे आवश्यक आहे. सतत इतरांपासून दूर राहिल्यामुळे रुग्णाची चिडचिड होणे स्वाभाविक आहे. आपल्यापासून सर्वजण दूर राहत आहेत, हे पाहून रुग्णाची मानसिक स्थिती बिघडणे शक्य आहे. त्यामुळे दूर राहूनसुद्धा आपण त्याच्यासोबत आहोत, ही भावना रुग्णापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
 • खबरदारी घेऊन आपण रुग्णाला त्याच्यासोबत आहोत, याची जाणीव करून देऊ शकतो. ते कौशल्य घरातील सर्वांनी आत्मसात करायला हवे.
 • रुग्णाने स्वतःच काही मर्यादा पाळल्या तर उत्तमच; परंतु खूप कमी वयाचा किंवा वार्धक्याकडे झुकलेला रुग्ण असल्यास ही गोष्ट शक्य होईलच असे नाही. त्यामुळे घरातील इतर व्यक्तींनीच घरात स्वतंत्र खोलीत ठेवलेल्या रुग्णासंबंधी एक आचारसंहिता ठरवून घेणे आवश्यक आहे.
 • रुग्णातील आणि आपल्यातील अंतर केवळ शारीरिक आहे आणि मनाने आपण त्याच्यासोबत आहोत, याची जाणीव आपल्याला झाली तर रुग्णाला निश्चितच होईल.
 • करोना हा बरा होऊ शकणारा आजार आहे, हे जाणून आपण भयमुक्त राहिलो तर रुग्णालाही भयमुक्त ठेवणे शक्य होणार आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे रुग्ण आपला कुटुंबीय असला, तरी काही दिवस केवळ शरीराने त्याला इतरांपासून दूर ठेवायचे आहे आणि त्याची देखभाल करणार्या व्यक्तीने स्वतःचीही काळजी जाणीवपूर्वक घ्यायची आहे.  
 • करोनाचा विषाणू वयोवृद्ध व्यक्तींना अधिक घातक ठरत असल्याचे दिसून आले आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, असे रुग्ण करोनाचा संसर्ग झाल्यानंतरसुद्धा बरे होत आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. तथापि, घरात असलेल्या रुग्णाचे वय जर अधिक असेल तर त्याच्यात दिसणार्या लक्षणांवर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
 • रुग्णाची आरोग्यासंबंधीची माहिती, इतिहास आपल्याला माहीत असायला हवा.
 • उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, मधुमेह असे आजार असणार्या व्यक्तींच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागते. कारण हे आजार रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी करणारे आहेत. दम्यासारखे जुनाट आजार असणार्या रुग्णांच्या बाबतीतही हेच लागू पडते.
 • करोनाची बाधा झाल्यास श्वसनसंस्था बाधित होते आणि रुग्णाला श्वास घेणे अवघड होते. असे होताना दिसल्यास रुग्णाला तातडीने रुग्णालयात न्यायला हवे.
 • रुग्णाचे वय आणि आजारांचा पूर्वेतिहास डॉक्टरांना माहीत असेल, तर त्यांना अचूक औषधोपचार करणे शक्य होईल.

– डॉ. महेश बरामदे

Advertisements

Related Stories

मधुमेह निदानासाठी तपासण्या

Omkar B

कोरोना काळात उपयुक्त गॅजेट

Omkar B

मुकाबला डयबेटिस न्यूरोपॅथीचा

Omkar B

नखे खाताय

Amit Kulkarni

फ्लोअर क्लीनर घेताना…

tarunbharat

N-95 मास्क कोरोना विषाणूचे संक्रमण रोखू शकत नाही

datta jadhav
error: Content is protected !!