तरुण भारत

घाम येतोय ?

उन्हाळ्यात प्रत्येकाला घाम येतो आणि काही वेळा घामाचा वासही येतो. त्यामुळे लाजही वाटते. पण घाम येणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे. घाम आल्यास शरीरातून एंडोर्फिन नावाचे चांगले हार्मोन स्रवते.

  • घाम येण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे घाम येत असेल तर घाबरुन जाऊ नका.
  • एका संशोधनानुसार घाम आणि लघवी या दोन्हीमध्ये मोठय़ा प्रमाणात धातू असतात.
  • घाम आल्याने हानीकारक रसायने बाहेर पडतात. शरीरात अनेक कार्बोनिक रसायने असतात, ज्याचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. घाम शरीरातील ही रसायने काढून टाकतो त्यामुळे आरोग्याची जोखिम कमी होईल.
  • घाम आल्याने त्वचेची रोमछिद्रे खुली होतात. शरीरातील घाण, जीवाणू बाहेर पडतात. त्यामुळे घाम आल्याने चेहरा स्वच्छ राहण्यास मदत होते.
  • घाम आल्याने रक्ताभिसरण चांगले होते त्यामुळे आंतरिक चमक मिळते. घाम आल्याने त्वचा मऊ होते. ती नैसर्गिकरित्याच चमकदारही दिसते.
  • घाम आल्याने त्वचेची रोमछिद्रे खुली होतात. डोक्याच्या त्वचेला जेव्हा घाम येतो तेव्हाही हीच प्रक्रिया होते त्यामुळे केस वाढतात. पण खूप जास्त घाम आल्यास मात्र केस शॅम्पूने धुवावे अन्यथा डोक्याच्या त्वचेला खाजही येऊ शकते.
  • व्यायाम करताना घाम आल्यामुळे मन प्रफुल्लित उत्साही होते. कारण जास्त व्यायाम केल्यास अधिक एडोर्फिन निर्माण होते. एंडोर्फिन हे आनंदाचे हार्मोन आहे. त्यामुळे आनंदाची भावना वाढीस लागते तसेच चांगली झोपही येते. 

Related Stories

विविध गुणांनी युक्त कडुलिंब

Omkar B

कोरोना बळींचा आकडा ५०७ पार

GAURESH SATTARKAR

टेनिस एल्बोवर उपचार

tarunbharat

मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यासाठी….

tarunbharat

बालायाम

Omkar B

व्याधी टॉन्सिल्सची

Omkar B
error: Content is protected !!