तरुण भारत

चपलेतून विषाणूप्रसार ?

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे जग चिंताक्रांत झाले आहे. दररोज शेकडो नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत आणि मृतांचा आकडा देखील वाढत चालला आहे.

 • कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना साफ सफाई, सोशल डिस्टसिंग यासारखी काळजी घ्यावयास सांगितली आहे. तसेच बाजारातून
  सामान आणताना देखील काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
 • एका संशोधनातून चपलेतूनही कोरोनाचा संसर्ग पसरु शकतो, असे निदर्शनास आले आहे.
 • चपलेचा सोल हा बॅक्टेरिया, फंगस आणि व्हायरसचा वाहक होऊ शकतो. चपलेवर कोरोना व्हायरसचे विषाणू पाच दिवस जिवंत राहू शकतात.
 • डेली मेलच्या एका अहवालानुसार कोराना व्हायरसचे विषाणू हे चपलेच्या खालील भागात पाच दिवस जीवंत राहू शकतो.
  विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जसे की सुपर मार्केट, ट्रान्सपोर्ट किंवा रुग्णालयात गेल्यानंतर तेथे वापरण्यात आलेल्या चपलेवर विषाणू असण्याची शक्यता अधिक राहते.
 • कोरोनाचा संसर्ग हा चपलेच्या सोलपर्यंत कसा पोचतो, हे देखील जाणून घेतले पाहिजे.
 • प्रत्यक्षात कोरोनाबाधित व्यक्ती शिंकल्याने किंवा खोकल्याने त्याच्या तोंडातून उडणार्या थेंबातून व्हायरस पसरतो. हे थेंब चपलेवर किंवा संसर्गाच्या संपर्कात आल्याने चपलेच्या सोलवरही येऊ शकतात.
  चपलेच्या सोल या डय़ूरेबल सिंथेटिक मटेरियल्स म्हणजेच रबर, पीव्हीसी किंवा लेदर प्लॅस्टिकने तयार केले असतात. या घटकावर वातावरणाचा कोणताच परिणाम होत नाही. त्यामुळे यावर बॅक्टेरिया जीवंत राहण्याची शक्यता अधिक राहते.
 • न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित असलेल्या एका अभ्यासात म्हटले की, कोरोना व्हायरस हा कार्डबोर्डवर चोवीस तास जिवंत राहतो. अर्थात वातावरणाच्या तापमानावर ही बाब अवलंबून राहते.
 • एका अभ्यासानुसार प्लॅस्टिक, स्टेनलेस स्टिलवर कोरोना व्हायरस दोन तीन दिवस जीवंत राहतो. तर चपलेल्या सोलरवर पाच दिवस हा व्हायरस राहतो. या अभ्यासाला कॅन्सास सिटी पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट कारोल आणि अन्य तज्ञांचाही आधार मिळाला आहे.
 • त्यांच्या मते, सिंथेटिक मटेरियल आणि प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या चपलेवर व्हायरस सक्रिय राहतो.
 • तज्ञांच्या मते, कोरोना संसर्ग बाधित सार्वजनिक ठिकाणी जावून आल्यानंतर चपला दाराबाहेरच काढाव्यात. विशेषतः शॉपिंग मॉल्स किंवा बाहेर काम करणार्या नागरिकांनी आणि आरोग्य कर्मचार्यांनी अशा प्रकारची काळजी घ्यावी असे म्हटले आहे.
 • कोरोनावरील योग्य उपचाराचे उत्तर सापडण्याअगोदर त्यापासून बचाव करणे हाच एकमेव ठोस उपाय आहे.

Related Stories

हस्तोत्तानासनचे फायदे

Amit Kulkarni

‘हेपेटाइटिस-ए’ पासून बचावासाठी…

Omkar B

मुलांमधील बध्दकोष्ठता

tarunbharat

टॉन्सिलायटीसचा सामना करताना

Amit Kulkarni

कोविड कवच पॉलिसी दहा जुलै पर्यंत आणण्याचा सरकारचा प्रयत्न

datta jadhav

हाता पायाला मुंग्या येत आहेत

Amit Kulkarni
error: Content is protected !!