तरुण भारत

लॉक डाऊन हा कोरोनाचा फैलाव रोखण्यावर उपाय नाही : राहुल गांधी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. देशावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. या संकटाला हरावण्यासाठी फक्त लॉक डाऊन हा उपाय पुरेसा नाही असे म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. राहुल गांधी यांनी व्हिडियो कॉन्फरन्स द्वारे प्रसारमाध्यमांशी सवांद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

Advertisements

ते म्हणाले, देशात कोरोना संकटामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. याला आळा घालण्यासाठी देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे. मात्र, लॉक डाऊन हा पर्याप्त उपाय नाही, लॉक डाऊन म्हणजे फक्त पॉज बटन आहे. लॉक डाऊन मुळे आता काही काळ संसर्ग थांबेल. पण लॉक डाऊन संपल्यावर कोरोना पुन्हा पसरेल. यासाठी सरकारला टेस्टिंग ची क्षमता वाढवण्याची गरज आहे. 


आपल्याला कोरोना विरोधात शेवटपर्यंत लढायच आहे. त्यामुळे या संकटाच्या काळात एकजूट दाखवण्याची गरज आहे. जात, धर्म, राजकीय मतभेद बाजूला ठेऊन आपण सर्व जण एकत्र लढलो तर आपल या संकटावर नक्की मात करू असे ही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे. 


पुढे ते म्हणाले, सध्या देशात आणीबाणी सारखी स्थिती निर्माण झाली आहे. बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे लघु उद्योग वाचवण्यासाठी सरकारने तरतूद केली पाहिजे. बेरोजगारी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. गरीब जनतेला तत्काळ आर्थिक मदत केली पाहिजे. जीएसटी ची रक्कम राज्यांना दिली पाहिजे.

तसेच आपल्याकडील धान्य लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे. दहा किलो तांदूळ व गहू आणि एक एक किलो डाळ आणि साखर दर आठवड्याला दिली पाहिजे असं ही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. 

Related Stories

सात चिमुकल्यांसह 14 वऱ्हाडी ठार

Patil_p

दुसरे आर्थिक पॅकेज देण्याची तयारी

Patil_p

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर आक्षेपार्ह पोस्ट, तरुणाला अटक

triratna

”सर्वाधिक लसी महाराष्ट्राला दिल्या, तरीही लसींचा पुरवठा होत नाही अशी राज्य सरकारची तक्रार”

triratna

महाराष्ट्रातील 203 विद्यार्थी अडकलेत रशियात

datta jadhav

”रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याचे फडणवीसांनी वकीलपत्रं घेतलं काय?”

triratna
error: Content is protected !!